• Download App
    Sonia Gandhi बांगलादेशी हिंदूंच्या शिरकाणावर गप्प, पण गाझा आणि इराणवरच्या हल्ल्यांची सोनिया गांधींना चिंता; The Hindu मध्ये लिहिला लेख!!

    बांगलादेशी हिंदूंच्या शिरकाणावर गप्प, पण गाझा आणि इराणवरच्या हल्ल्यांची सोनिया गांधींना चिंता; The Hindu मध्ये लिहिला लेख!!

    बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचे मोठे शिरकाण झाले त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कुठली चिंताजनक प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती, पण गाझा पट्टी आणि इराण यांच्यावर इजराइलने प्रतिबंधात्मक हल्ले केले. त्यावरून मात्र सोनिया गांधींनी चिंता व्यक्त करणारा लेख The Hindu या वृत्तपत्रात लिहिला तो काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सगळीकडे शेअर केला. Sonia Gandhi

    सोनिया गांधी यांनी या लेखात भारताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. भारताने आपली तटस्थता टाकून दिली. इजरायलला प्रोत्साहन दिले. इजरायलने गाझा पट्टी आणि इराणावर हल्ले करून तिथे हिंसाचार घडवून निष्पापांचे बळी घेतले. भारताचे सरकार याकडे मूक दर्शक म्हणून पाहत राहिले. हे खरे भारताचे परराष्ट्र धोरण नाही. भारताने नेहमीच शांततामय सहअस्तित्वाचे धोरण अवलंबिले. हे सध्याच्या सरकारने सोडून दिले आहे, असे सोनिया गांधींनी लेखात नमूद केले.

    द्विराष्ट्रवादी सिद्धांतानुसार इजराइलच्या शेजारी पॅलेस्टाईनचे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र निर्माण करून इजराइल आणि पॅलेस्टाईन यांनी सह अस्तित्वाने नांदावे ही भारताची जुनी भूमिका आहे. तीच भूमिका केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने कायम ठेवायला हवी होती. पण मोदी सरकारने या भूमिकेकडे पूर्ण दुर्लक्ष करून इजराइयला प्रोत्साहन दिले. त्या देशाने इराण आणि गाजा पट्टीवर हल्ले केले. त्यावेळी सरकार मूक दर्शक बनवून राहिले ही सध्याच्या भारतीय परराष्ट्र धोरणातील मोठी चूक ठरली. भारताचे सक्रिय तटस्थतेचे धोरण पुढे नेण्याची नैतिक जबाबदारी मोदी सरकारने पार पाडली नाही, असे टीकास्त्र सोनिया गांधींनी सोडले. गाजा पट्टी आणि इराण मधल्या मानवतेला धक्का लागल्याची चिंता सोनिया गांधींना वाटली.



    – बांगलादेशातल्या हिंदू शिरकाणावर गप्प

    पण काहीच महिन्यांपूर्वी बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली तिथली लोकशाही राजवट उलथून टाकण्यात आली. नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ मोहम्मद युनुसने तिथली सत्ता ताब्यात घेतली त्याचवेळी तिथे हिंसाचार घडवून हिंदूंचे शिरकाण करण्यात आले. त्याविरुद्ध जगभर आवाज उठले. लाखो हिंदूंनी मोर्चे काढले. त्यावेळी सोनिया गांधींनी हिंदूंवरच्या अत्याचाराचा कुठला निषेध करणारा एक शब्दही काढला नाही किंवा The Hindu सारख्या वर्तमानपत्रांमध्ये लेखही लिहिला नाही.

    – नेहरू + राजीव परराष्ट्र धोरण भारतावर लादले

    शिवाय आज भारताच्या “ज्या” “तटस्थ” परराष्ट्र धोरणाचा सोनिया गांधींनी लेखात उल्लेख केला, ते तथाकथिक “तटस्थ” परराष्ट्र धोरण हे मूळात इजराइल विरोधात पॅलेस्टाईनच्या बाजूने अतिरिक्त झुकणारेच होते‌. पश्चिम आशियातले मुस्लिम देश खुश व्हावेत. त्यांनी भारताविरुद्ध बोलू नये यासाठी नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानाने फक्त पॅलेस्टाईनचीच बाजू उचलून धरली होती. केवळ मुस्लिम देश आणि भारतातला मुस्लिम समुदाय नाराज होऊ नयेत म्हणून इजरायलशी राजनैतिक संबंध जोडण्याचे सौजन्य देखील नेहरू आणि इंदिरा गांधी ते अगदी राजीव गांधी यांच्या सरकारने दाखविले नव्हते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी यासीर अराफात याच्यासारख्या दहशतवाद्याला पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्रमुखांचा दर्जा दिला होता. त्यावेळी भारताने जणू इजरायलचे स्वतंत्र अस्तित्वच अमान्य केले होते.

    1991 नंतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीतील नजाकत ओळखून तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारत आणि इजरायल यांच्यातले राजनैतिक संबंध सुरू केले. नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशांमध्ये दूतावास उघडले.

    पण वर उल्लेख केलेल्या सगळ्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून सोनिया गांधींसारख्या अत्यंत ज्येष्ठ आणि वरिष्ठ राजकीय नेत्याने नेहरू इंदिरा आणि राजीव यांनी राबविलेले धोरण भारताचे धोरण म्हणून सध्याच्या भारतावर लादायचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणातल्या उणीवा काढल्या. यापलीकडे त्यांच्या लेखातून दुसरा कुठला खरा राजकीय अन्वयार्थ काढता येणे कठीण आहे.

    Sonia Gandhi kept mum aur Hindu genocide in Bangladesh, but cried for Gaza and Iran

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू