मतदान चोरी प्रकरणावरून निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!, असेच राहुल गांधींच्या आत्तापर्यंतच्या राजकीय खेळींवरून स्पष्ट होते.Sonia Gandhi imposed Rahul Gandhi’s leadership on INDI alliance through vote chori allegations
राहुल गांधींनी ज्या प्रकारे मतदान चोरीचा विषय लावून धरला आणि त्यांच्या पाठोपाठ सगळ्या प्रादेशिक नेतृत्वाची फरफट केली, ते पाहता वर उल्लेख केलेलाच मुद्दा खरा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि काही काळानंतर INDI आघाडीवर राहुल गांधींचे नेतृत्व लादायचा प्रयत्न काँग्रेसने विशेषतः सोनिया गांधींनी करून पाहिला होता. परंतु, त्या प्रयत्नांना ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी खोडा घातला होता. INDI आघाडी लोकसभेची निवडणूक जिंकलीच नाही. ती आघाडी लोकसभा निवडणुकीपुरतीच होती. विधानसभा निवडणुकांमध्ये तिचा संबंध नव्हता असे सांगून ममता आणि अखिलेश यांनी INDI आघाडीची वासलात लावतच आणली होती.
पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेस पक्षाच्या जागा वाढल्या. इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या जागा वाढल्या. त्यामुळे काँग्रेसच्या विशेषतः सोनिया गांधींच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना राहुल गांधींचे नेतृत्व संपूर्ण INDI आघाडीवर लादायचे धुमारे फुटले होते. परंतु, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी त्यांना कात्री लावली होती. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी प्रादेशिकांची वेगळी वाट चोखाळली होती. अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेतली होती. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते असून देखील INDI आघाडीत त्यांचे नेतृत्व डळमळले होते. शेवटी त्यांना जात निहाय जनगणनेचा प्रादेशिक पक्षांचा मुद्दा काँग्रेसचा म्हणून उचलून धरावा लागला होता. तरीदेखील अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासारखे नेते राहुल गांधींचे नेतृत्व लादून घ्यायला तयार नव्हते.
– सोनिया कार्ड ऍक्टिव्हेट
या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी कार्ड ऍक्टिव्हेट झाले आणि त्यानंतर मतदान चोरीचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणायला सुरुवात झाली. त्यातच बिहार मधल्या SIR म्हणजे मतदार यादीच्या संपूर्ण निरीक्षणाची भर पडली. काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली SIR विरोधातला मुद्दा आग्रहाने लावून धरला आणि बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची त्यांना साथ मिळाली. त्या पाठोपाठ राहुल गांधींनी पत्रकार परिषदा घेऊन निवडणूक आयोगाला टार्गेट करायला सुरुवात केली. काँग्रेसने मतदान चोरीचा मुद्दा अशाप्रकारे तापविला की आत्तापर्यंत राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार नसलेल्या INDI आघाडीतल्या नेत्यांना राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहणे भाग पडायला लागले. त्यात शरद पवार आणि ममता बॅनर्जी हे देखील अपवाद ठरले नाहीत. कारण बिहार पाठोपाठ बंगालमध्ये SIR मुद्दा येणार आणि मतदार यादीचे संपूर्ण मूल्यांकन होणार याची जाणीव ममतांना झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मागे प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वांची आपोआपच फरफट झाली.
मतदान चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी जे बोलतील किंवा जी कृती करतील ती तर्कशुद्ध नसो किंवा राजकीय दृष्ट्या खोटी असो, तो मुद्दा बाकीच्या सगळ्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना जसाच्या तसा उचलून धरावा लागला. कारण “सोनिया बुद्धी”ने त्याची राजकीय वातावरण निर्मिती चांगली केली. “राहुल बुद्धी”च्या मागे “पवार बुद्धी”, “ममता बुद्धी”, “अखिलेश बुद्धी”, “उद्धव बुद्धी” दिल्लीतल्या यमुनेत वाहून जाण्याची व्यवस्था केली.
Sonia Gandhi imposed Rahul Gandhi’s leadership on INDI alliance through vote chori allegations
महत्वाच्या बातम्या
- Airspace : पाकिस्तानचे 2 महिन्यांत 127 कोटींचे नुकसान; सिंधू करार रद्द झाल्यानंतर भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद
- मराठा + ओबीसी बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!!
- दोन लोक भेटल्याच्या मुद्द्यावर किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला
- Kolkata Rape : कोलकाता रेप-मर्डर केसला एक वर्ष पूर्ण, डॉक्टरांची रॅली; संघटनेने म्हटले- सीबीआय तपास कधी पूर्ण होणार?