‘मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय भ्रष्टाचार होणे अशक्य’, असही शुभेंदु अधिकारी यांनी म्हटलं आहे..
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Shubhendu Adhikari पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष’ पाठिंब्याशिवाय भ्रष्टाचार शक्य नाही, असा आरोप करत त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवली.Shubhendu Adhikari
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि नोकरशहा सत्ताधारी तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यात गुंतले आहेत, असा आरोपही भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला. अगदी एक दिवस आधी, ममता बॅनर्जी यांनी CID मध्ये ‘संपूर्ण फेरबदल’ सुरू करण्याची घोषणा केली होती आणि खालच्या स्तरावरील पोलिसांचा एक भाग भ्रष्टाचारात गुंतला असल्याचा आरोप केला होता.
“ममता बॅनर्जींना 13 वर्षांच्या सत्तेनंतर सुधारणांची गरज जाणवली असेल, तर त्यांनी प्रथम भ्रष्ट व्यक्ती आणि माफियांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल केलेले 1,600 कोटी रुपये परत करावेत,” असा दावा शुभेंदु अधिकारींनी केला.
याशिवाय भाजपने आरोप केला की, “मुख्यमंत्री नुकसान भरून काढण्याचा अट्टाहास करत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत आणि स्वतःशीच विरोधाभासी विधाने करत आहेत. जर त्यांना खरोखरच पारदर्शकता सुनिश्चित करायची असेल, जसे त्या दावा करत आहे, तर त्यांनी हे मान्य केले पाहिजे की IPS अधिकारी आणि नोकरशहांच्या एका वर्गाने त्यांना निवडणूक रोख्यांसाठी निधी उभारण्यात मदत केली आहे.
सरकारच्या कल्याणकारी योजना भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी दावा केला, “मुख्यमंत्री कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दोष ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु सत्य हे आहे की भ्रष्टाचाराची प्रचंड व्यवस्था त्यांच्या पक्षाच्या धोरणांचा आणि पद्धतींचा परिणाम आहे.” शुभेंदू अधिकारी यांनी ममतांवर जोरदार हल्लाबोल केला.