• Download App
    Wajahat Khan शर्मिष्ठा पनोली प्रकरणातील फिर्यादीच निघाला हिंदूविरोधी, तक्रार दाखल करणाऱ्या वजाहत खानला हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अटक

    Wajahat Khan : शर्मिष्ठा पनोली प्रकरणातील फिर्यादीच निघाला हिंदूविरोधी, तक्रार दाखल करणाऱ्या वजाहत खानला हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अटक

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिच्याविरोधात तक्रार दाखल करणारा वजाहत खान यालाच आता कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. खानने हिंदू देवतांविषयी अश्लील, अपमानास्पद आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शब्दांत सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. Wajahat Khan

    श्रीराम स्वाभिमान परिषद या संघटनेने खानविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार खानने हिंदू धर्म, देवता आणि परंपरांविषयी “रेपिस्ट संस्कृती”, “मूत्रपान करणारे लोक” यांसारख्या घृणास्पद अपशब्दांचा वापर करत सोशल मीडियावर द्वेषजनक प्रचार केला होता. ही पोस्ट्स इन्स्टाग्राम, ट्विटर (X) आणि इतर सोशल हँडल्सवरून करण्यात आल्या होत्या. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. Wajahat Khan



    1 जूनपासून खानकडे पोलिसांचे समन्स पोहचवले जात होते, मात्र तो सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करत होता. तो फरार झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून अखेर त्याला अटक केली आहे.

    शर्मिष्ठा पनोली हिने ऑपरेशन सिंदूर प्रकरणावरून काही मुस्लिम बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर टीका करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. काही कठोर आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील शब्दप्रयोग केले होते. यावर वजाहत खानने तक्रार दाखल केल्यानंतर तिला ३० मे रोजी अटक करण्यात आली होती. शर्मिष्ठाने नंतर व्हिडिओ हटवून सार्वजनिक माफी मागितली होती. सध्या तिला कोर्टाकडून काही कडक अटींसह तात्पुरता जामीन मिळालेला आहे.

    शर्मिष्ठा पनोली सारख्या इन्फ्लुएंसरविरोधात कारवाईसाठी पुढे सरसावलेला खान स्वतःच धार्मिक तेढ पसरवणाऱ्या भाषेचा वापर करत असल्याचे उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या दुटप्पी भूमिकेवर प्रचंड टीका होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर यास “न्यायचा विजय” म्हटले असून हिंदू धर्माविरोधातील विषारी प्रचाराला चपराक मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

    Sharmistha Panoli case turned out to be anti-Hindu, Wajahat Khan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली

    NEET Re-Exam 2026 : NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील; अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही

    Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला