विशेष प्रतिनिधी
पुणे : टीव्ही मनोरंजन विश्वातील रियॅलिटी शो शार्क टँक ज्यांनी पाहिला असेल त्यांना पियुष बन्सल कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. देशातील नवउद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम पियुष बन्सलनं केले आहे. त्यानं अल्पावधीत स्वताच्या नावाची ओळख तयार केली आहे. Shark Tank show news piyush bansal
पियुष आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण दिल्लीतील नीति बागेत खरेदी केलेलं घर. लेन्सकार्ट या प्रसिद्ध ब्रँडचा सर्वेसर्वा म्हणून पियुषकडे पाहिले जाते. शार्क टँकमध्ये सगळ्यात जास्त ज्याच्या नावाची चर्चा होते त्यामध्ये पियुषचे नाव घेतले जाते. अचूक आणि तितकचं मार्मिक बोलणं हे पियुषला जमले आहे.
पियुषला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. १८ कोटींचे घर घेणाऱ्या पियुषचं त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. घराची खरेदी पियुषच्याच नावानं झाली असून तो व्यवहार १९ मे २०२३ रोजी झाल्याचे सांगण्यात आले आहे. १८ कोटींसाठी बन्सलनं एक कोटी रुपयांची स्टँम्प डयुटी दिली आहे.
त्या कागदापत्रानुसार, बन्सलनं खरेदी केलेल्या घराचा एरिया हा ४६९.७ स्केअर मीटर असून एकुण एरियाहा ९३९.४ स्क्वेअर मीटर एवढा आहे. बन्सलनं तो बंगला सुरिंदर सिंग अटवाल यांच्याकडून खरेदी केला आहे. बन्सल विषयी आणखी सांगायचे झाल्यास तो गेल्या काही दिवसांपासून शार्क टँकमुळे चर्चेत आला आहे. त्यानं याशिवाय काही रियॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे.
Shark Tank show news piyush bansal
महत्वाच्या बातम्या
- सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
- पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
- आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
- जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार