• Download App
    NCP(SP) : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!! Sharad Pawar

    NCP(SP) : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!

    नाशिक : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!, हीच राजकीय वस्तुस्थिती शरद पवारांच्या आजच्या भाषणातून समोर आली.

    एकीकडे सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करायची सूचना केली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमात सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे यांनी सावित्रीबाई फुले मालिकेचे ब्रॅण्डिंग करून घेतले. याच निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी मराठी कलाकारांना झापले.

    • काँग्रेसला मारला डोळा

    पण त्यापलीकडे जाऊन शरद पवारांनी मोठे भाषण करून राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी काँग्रेसला डोळा मारला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीविषयी भाष्य आणि मार्गदर्शन करण्यापेक्षा पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची स्तुती करण्यात धन्यता मानली. त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांची अफाट स्तुती केली. ती स्तुती करताना त्यांनी मोदी भक्तांना चिमटे काढले. पण शरद पवारांच्या या सगळ्या भाषणाचा हेतू काँग्रेसवरच लाईन मारण्याचा ठरला.



    • नेहरूंशी तुलना चूक

    शरद पवार म्हणाले, सध्या काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलाना पंडित नेहरूंची करतायेत. पण मोदी आणि नेहरू यांच्या तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान पदाचा सध्या आब राखला जात नाही. पंडित नेहरू यांचे भारताच्या इतिहासातले स्थान अढळ आहे. नेहरू पंतप्रधान होण्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करत होते. त्यांनी इंग्रजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले होते. ते भारत देश विसरू शकत नाही. नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. पण तशी तुलना करण्याचा काही लोक प्रयत्न करतात हे चूक आहे!!

    • इंदिरा गांधींची स्तुती

    त्यापुढे जाऊन शरद पवारांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली. इंदिरा गांधींच्या मास्को दौऱ्यातली गोष्ट सांगितली. इंदिरा गांधी रशियाला गेल्या त्यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागताला रशियाचे पंतप्रधान आले नव्हते म्हणून इंदिरा गांधी भारताचे त्यावेळचे राजदूत गुजराल यांच्या घरी गेल्या. त्यांच्या मुलांशी गप्पा मारत बसल्या. त्यावेळी रशियाचे पंतप्रधान त्यांच्या निवासास्थानी इंदिरा गांधींची वाट पाहात थांबले. पण इंदिरा गांधी लगेच तिकडे गेल्या नाहीत. रशियाचे पंतप्रधान 40 कोटी भारतीयांच्या पंतप्रधानांच्या स्वागताला आले नाहीत ही त्यांची चूक इंदिरा गांधींनी धाडसाने दाखवून दिली. इंदिरा गांधींनी भारताच्या प्रतिष्ठेशी कधी तडजोड केली नाही, याची आठवण शरद पवारांनी करून दिली. त्याचवेळी शरद पवारांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी शीख समाजाविषयी काढलेल्या उद्गारांचाही निषेध केला.

    • पवारांच्या भाषणाचा रोख आणि योगायोग

    पण शरद पवारांच्या आजच्या भाषणाचा सगळा रोख नेहरू आणि इंदिरा गांधी यांची स्तुती करण्यावरच होता. पवारांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी कुठला मोठा कार्यक्रम हाती देण्याऐवजी नेहरू आणि इंदिरा गांधी किती मोठे होते आणि कसे महान होते याविषयीच भाषण करायचे मुद्दे दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला बरे वाटेल आणि सुखद वाटेल, असेच भाषण केले. एकीकडे सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेस पक्ष मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याची सूचना केली, त्याच दिवशी शरद पवारांनी नेहरू आणि इंदिरा गांधींची स्तुती करून काँग्रेसवर लाईन मारली!!, हा विलक्षण राजकीय योगायोग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड केल्याच्या दिवशी घडला!!

    Sharad Pawar praise Nehru and Indira Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे PMO मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन; PMO मधला दुर्मिळ फोटो समोर!!

    Meenakshi Natrajan : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का! मीनाक्षी नटराजन यांचे राज्यसभा नामांकन रद्द; आमदारांना घेऊन जाणारे विमानही धावपट्टीवरून परतले

    मोदी सरकारची तपपूर्ती; विरोधकांच्या (बचावासाठी) गाठीभेटी!!