नाशिक : पवारांच्या 85 व्या वाढदिवशी बड्यांच्या गाठीभेटी; पुन्हा एकदा विश्वासार्हतेवर संशय पेरणी!!, असेच काल दिवसभर घडले.
शरद पवारांनी आपला 85 वा वाढदिवस काल राजधानी नवी दिल्लीत साजरा केला. यामध्ये महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असा काही पराक्रम केला, की त्यांनी शरद पवारांना हाती तलवार दिली आणि त्या तलवारीने पवारांनी वाढदिवसाचा केक कापला.
शरद पवारांना अनेक बड्या नेत्यांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील समावेश होता. त्याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेऊन गेले. त्यानंतर सायंकाळी अमित शाह पवारांच्या घरी पोहोचले. या सगळ्या भेटीगाठी मधून पुन्हा एकदा शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर संशय पेरणी झाली.
BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…
शरद पवारांचे राजकारण म्हणजे कात्रजचा घाट म्हणजेच विश्वासघात, हे समीकरण 1978 पासून महाराष्ट्र पाहतो आहे. त्यात पवारांच्या 85 व्या वाढदिवसाच्या गाठीभेटींची भर पडली. एकीकडे शरद पवार यांनी “इंडी” आघाडीचे नेतृत्व करायला ममता बॅनर्जी समर्थ आहेत आणि सक्षम आहेत, असे सांगून राहुल गांधींच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण “इंडी” आघाडीत आपण कायम राहिल्या असेही संकेत दिले, तर दुसरीकडे वाढदिवशी अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटी देऊन स्वतःच्या राजकीय विश्वासार्हतेवर संशयाची पेरणी करून घेतली.
शरद पवार अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटी उघड भेटीगाठींवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरी बातमी समोर आली, ती गुप्त भेटीची होती. गौतम अडाणी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी म्हणे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांची गुप्त भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची नव्याने चर्चा सुरू झाली.
– पवारांच्या राष्ट्रवादीतच दोन गट
शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादीत आता दोन गट पडले असून एक गट अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये विलीन होण्यास उत्सुक आहे, तर दुसरा गट भाजपबरोबर सत्तेची नवी समीकरणे जुळवून घ्यावी त्यासाठी पवारांना आग्रह करतो आहे, असे काही मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे, पण एकूण पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर संशय पेरणी आणि सत्तेच्या वळचणीला जाण्याची घाई हेच पवारांचे राजकारण या निमित्ताने उघड्यावर आले आहे.
Sharad pawar politics of Betrayal exposed on his 85 birthday again
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूतील खासगी रुग्णालयास भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
- BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…
- One Nation One Election : विधेयकाला मोदी सरकारची मंजूरी, पण ते JPC कडे पाठवायची काँग्रेसची तयारी!!
- Dantewada : दंतेवाड्यात नक्षलवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, सात माओवादी ठार