• Download App
    Sharad Pawar पवारांनी दाखवली आपल्या पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट??

    पवारांनी दाखवली आपल्या पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट??

    नाशिक : शरद पवारांनी दाखवली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट??, असा सवाल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलाय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत cross voting होण्याची शक्यता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.

    या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान सुरू असताना शरद पवारांनी संसदेबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या खासदारांबरोबर फोटो सेशन करून आपल्या पक्षातल्या खासदारांची एकजूट दाखवली. ते सगळ्यांना बरोबर घेऊन मतदानाला संसदेत गेले.



    – राहुल गांधी मलेशियात

    पण या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ने जी तयारी केली, तेवढी तयारी INDI आघाडीची दिसली नाही. उलट राहुल गांधी आणि बाकीचे विरोधी पक्ष संसदेत आणि संसदेच्या बाहेर मतदान चोरीवरून मोठा बवाल उभा करत असताना प्रत्यक्षात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपली एकजूट टिकवून सत्ताधारी आघाडीतली मते फोडायची कुठलीही रणनीती आखण्यात यशस्वी झाल्याचे दिसले नाही. राहुल गांधी तर ऐन निवडणुकीच्या मध्यावर मलेशियाला निघून गेले. त्यांनी आपल्या खासदारांना मतदानासंदर्भात कुठले मार्गदर्शन केल्याचे दिसले नाही. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी सुद्धा यात कुठे active दिसल्या नाहीत. INDI आघाडीच्या नेत्यांनी काल mock voting घेऊन खासदारांना मतदानाचे प्रशिक्षण दिले. पण हे प्रशिक्षण फक्त काही तासांचेच ठरले. त्या पलीकडे विरोधकांची कुठली रणनीती दिसली नाही.

    त्याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे वगळता अन्य कुठल्या नेत्यांच्या घरी INDI आघाडीच्या बैठका झाल्याचे दिसले नाही. तशा बैठका झाल्या असल्यास त्यांचे वृत्तांकनही प्रसार माध्यमांनी केले नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव होणारच आहे. संख्याबळ जमणारच नाही, तर उगाच मोठ्या राजकीय हालचाली करून प्रसार माध्यमांचे लक्ष आपल्याकडे कशाला वेधून घ्या??, असा पोक्त राजकीय विचार INDI आघाडीतल्या घटक पक्षांच्या बड्या नेत्यांनी केला असल्यास त्याला रणनीती म्हणता येणार नाही.

    पण या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवारांना मात्र आपल्या पक्षाची एकजूट दाखवावीशी वाटली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पक्षाची धूळधाण झाली असली तरी पक्षाचे खासदार अजूनही आपल्या बरोबर आहेत, असे शरद पवारांनी फोटो सेशन मधून दाखवून दिले. पण एवढे करूनही पवार INDI आघाडीतल्या खासदारांची फूट टाळू शकतील का??, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दाट शंका व्यक्त होत आहे.

    Sharad Pawar, NCP-SCP MPs arrive at the Parliament to cast their vote for Vice Presidential election.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : PM मोदींनी खासदारांना स्वदेशी मेळावे आयोजित करण्यास सांगितले; म्हणाले- व्यापाऱ्यांना जीएसटी सुधारणांबद्दल सांगा!

    The existence of 15 political parties : राष्ट्रवादीसह 15 राजकीय पक्षांच्या अस्तित्वावर टांगती तलवार ; भूमिका मांडण्याचा आदेश

    सरकारे कोसळण्याचा दिवस; फ्रान्स आणि नेपाळ मधली सरकारे आज एकाच दिवशी घरी!!; भारतात कुणाच्या मतांमध्ये फाटाफुटी??