• Download App
    Sharad Pawar पवारांना म्हणे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर की राजकीय पुडी??; पण पवारांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, तेव्हा काय झाले होते??

    पवारांना म्हणे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर की राजकीय पुडी??; पण पवारांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, तेव्हा काय झाले होते??

    नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला हवा मिळाल्यानंतर काही मराठी माध्यमांनी बातम्यांचे मोठमोठे इमले उभे करायला सुरुवात केली. त्यातूनच शरद पवारांना म्हणे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांमधून समोर आल्या. पण पवारांना खरंच गांधी कुटुंबीयांपैकी कुणी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली, की पवारांच्या गोटातूनच तशी कुणी पुडी सोडली, हे कुणी जाहीरपणे बोलायला तयार झाले नाही.

    – बातमीला अधिकृत दुजोरा नाही

    शरद पवारांना म्हणे, गांधी कुटुंबीयांपैकीच कुणीतरी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि जेष्ठतेचा काँग्रेसला फार मोठा फायदा होऊन काँग्रेस सत्तेवर आली असती असा होरा म्हणे काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला होता. पण शरद पवारांनी नम्रपणे ती ऑफर नाकारली त्यामुळे त्यांच्या जागी गांधी कुटुंबीयांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले!! अर्थात केवळ सूत्रांच्या हवाल्याने काही मराठी माध्यमांनी या बातम्या दिल्या. काँग्रेस मधल्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या कुठल्याही नेत्यांनी या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिला नाही.

    – पवारांच्या महत्त्वाकांक्षा नेहमीच मोठ्या, पण…

    पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी कधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा मनी धरली नव्हती, असे बिलकुल नाही‌. उलट शरद पवार काँग्रेसचे अध्यक्षपदावर जाऊन बसायची महत्त्वाकांक्षा मनात धरली होती आणि तशी राजकीय कृती सुद्धा केली होती, इतकेच काय पण शरद पवारांनी पंतप्रधान पदावर जाऊन बसण्याची महत्त्वाकांक्षा सुद्धा मनात धरली होती. पण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आणि देशाच्या पंतप्रधान पदावर जाऊन बसण्याची पवारांची महत्त्वाकांक्षा त्यांच्या राजकीय कर्तृत्वाअभावी अपयशी ठरली. शरद पवारांना ना कधी काँग्रेसचे अध्यक्ष होत आले, ना कधी पंतप्रधान होता आले!!



    – सीताराम केसरींविरुद्ध पवार हरले

    1997 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांना आव्हान दिले होते. सीताराम केसरी हे त्यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव यांना बाजूला सारून काँग्रेसच्या अध्यक्षपदावर जाऊन बसले होते. पण त्यांनीच काँग्रेसच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवडणूक घेतली. त्यावेळी शरद पवारांनी सीताराम केसरी यांना आव्हान दिले होते. त्याचबरोबर राजेश पायलट हे सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभे राहिले होते. त्या निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सर्व सदस्यांनी मतदान केले होते. त्यावेळी सीताराम केसरी यांना तब्बल ६२२४ मते मिळाली. शरद पवार फक्त ८८२ मते मिळवू शकले, तर राजेश पायलट यांना फक्त ३५४ मध्ये मिळाली. सीताराम केसरी यांच्यासारख्या सर्वांत दुबळ्या नेत्याकडून शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दारुण हरले होते. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडून सीताराम केसरी यांना सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून दूर व्हावे लागले. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा काढून शरद पवारांनी स्वतःहून काँग्रेसच्या बाहेरचा रस्ता धरला.

    – काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाशी पवारांचा कायम अपयशी पंगा

    शरद पवार आणि गांधी परिवार यांचे नाते विश्वासापेक्षा अविश्वासाचे जास्त राहिले. इंदिरा गांधींनी शरद पवारांना संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्याबरोबर काम करायचा सल्ला दिला होता. पण तो शरद पवारांनी मान्य केला नव्हता. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधींनी काही काळ शरद पवारांवर विश्वास ठेवला, पण शरद पवारांच्या काही राजकीय कारवायांमुळे राजीव गांधींचाही त्यांच्या वरचा विश्वास उडाला. शरद पवारांनी पी. व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांशी स्पर्धा करून पाहिली, पण त्यात शरद पवार पराभूत झाले. शरद पवारांचे काँग्रेसच्या कुठल्याच सर्वोच्च नेत्याशी कधी पटले नाही. शरद पवारांच्या राजकीय कारवायांमुळे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी कायमच त्यांच्याकडे अविश्वासार्ह नेता म्हणून पाहिले. त्यामुळे सोनिया गांधी किंवा गांधी परिवारातील अन्य नेत्यांनी शरद पवारांना 2024 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपदाची ऑफर दिली असेल, ही खऱ्या बातमी ऐवजी पवारांच्याच गोटातून सुटलेली राजकीय पुडी असण्याची दाट शक्यता आहे!!

    Sharad Pawar heavily lost Congress presidential election against Sitaram Kesari

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Belfast Riots : बेलफास्टमध्ये स्थलांतरितांविरोधी हिंसाचार भडकला; घरे जाळली, पोलिसांवर हल्ले, आयर्लंड-यूकेमध्ये तणाव

    Govt : मोदी सरकारचा मोठा निर्णय! उद्योगांना पेट्रोल पंपावरून पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यास बंदी; सामान्य वाहनधारकांवर काय परिणाम होणार?

    NEET : NEET परीक्षेवर संसदीय समितीचे ताशेरे; चीन-अमेरिकेच्या मॉडेलचा अभ्यास करण्याची शिफारस, NTA-NMC ला मोठा सल्ला