• Download App
    नागालँडमध्ये सत्ताधारी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण अखेर शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले... Sharad Pawar explained the reason behind his decision to go with the ruling BJP in Nagaland

    नागालँडमध्ये सत्ताधारी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेवर आली आहे. 60 पैकी 37 जागा या आघाडीने जिंकल्या आहेत. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी त्या सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही सुरू आहेत. तर हा निर्णय घेण्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: सांगितलं आहे. Sharad Pawar explained the reason behind his decision to go with the ruling BJP in Nagaland

    मराठी माध्यमांनी सांगितली पवारांची “पॉवरफुल” खेळी; पण नागालँडमध्ये राष्ट्रवादीची फुटीच्या भीतीने भाजपच्या सत्तेच्या मांडीला मांडी!!

    “नागालँडमध्ये निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सात विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपाबरोबर आम्ही युती केली नाही. आमची अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे.” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर “नागालँडमधील चित्र बघितल्यानंतर तेथे एकप्रकारे राजकीय स्थैर्य येण्यासाठी आमची मदत मुख्यमंत्र्यांना होत असेत, तर आमचा पाठिंबा आहे. मात्र, भाजपाला आमचा पाठिंबा नाही.’’ असंही शरद पवार म्हणाले.

    याशिवाय, ‘’मला आश्चर्य वाटतं मेघालय आणि शेजारील राज्यात निवडणुका पार पडल्या. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोघेही गेले होते. पंतप्रधानांनी मेघालयाच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं आणि निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांच्यासोबत सहभागी झाले व आपल्या सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात सहभागी केलं. ती भूमिका आम्ही नाही घेतली.” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

    Sharad Pawar explained the reason behind his decision to go with the ruling BJP in Nagaland

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार