• Download App
    राष्ट्रवादीतील संभाव्य फूट : पवार काका पुतण्यांपाठोपाठ बावनकुळेंनीही चर्चेवर टाकला पडदा!! |Sharad Pawar, ajit Pawar, supriya sule dropped the curtain on NCP split news, BJP state president chandrashekhar bawankule did the same

    राष्ट्रवादीतील संभाव्य फूट : पवार काका पुतण्यांपाठोपाठ बावनकुळेंनीही चर्चेवर टाकला पडदा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्यांवर, त्या दिवसभर चालल्यानंतर जसा शरद पवार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पडदा टाकला, तसाच पडदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही टाकला आहे.Sharad Pawar, ajit Pawar, supriya sule dropped the curtain on NCP split news, BJP state president chandrashekhar bawankule did the same

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. अजितदादा कुठेही जाणार नाहीत. तुमच्या जे मनात आहे, ते आमच्या मनात नाही. मी काय म्हणतो ते महत्त्वाचे आहे. त्याला फाटे फोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीतल्या संभाव्य फूटीवर भाष्य करताना बारामतीतल्या स्थानिक पत्रकारांना सुनावले.



    स्वतः अजित पवारांनी देखील मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. जीवनाच्या शेवटपर्यंत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचेच काम करणार आहे. हे काय आता स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? की प्रतिज्ञापत्र करू?, असा सवाल करत त्यांनीही राष्ट्रवादीतील फूटीच्या चर्चेवर पडदा टाकला. महाराष्ट्रात काहीही झाले की त्याचे खापर बिचाऱ्या दादांवर फुटते, अशी उद्विग्नता सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली.

    तरी देखील राष्ट्रवादीतल्या फुटीची चर्चा थांबली नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार संजय शिरसाट यांनी पवार काका – पुतणे आणि सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यांनंतरही राष्ट्रवादीतील संभाव्य फुटीवर वक्तव्ये करून त्या चर्चेला हवा दिली.

    मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या फुटीच्या विषयावर पडदा टाकला. अजितदादांच्या विश्वासार्हते विषयी शंका निर्माण करणे बरोबर नाही, असे सांगून बावनकुळे यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेणे हा भाजप समोर विषयच नाही. त्यावेळी 2019 मध्ये भाजपचा विश्वासघात झाला होता. त्यामुळे अपरिहार्यतेने देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा शपथविधी झाला. त्यावेळी जे व्हायचे ते होऊन गेले. पण आता तसा कोणताही विषय भाजपचा समोर नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट करून राष्ट्रवादीतील संभाव्य फूटीच्या बातम्यांवर भाजपमधून पडदा टाकला.

    याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये काही वाटाघाटी सुरू होत्या का?? आणि सुरू असल्या तर त्या पूर्ण तुटल्या आहेत की मध्यावर येऊन थांबल्या आहेत??, असे सवाल तयार होत आहेत.

    फूट पडणार नाही यावर भाजप – राष्ट्रवादीचे एकमत कसे?

    त्याच वेळी पवार काका – पुतणे आणि सुप्रिया सुळे यांच्याच सुरात सूर मिसळून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राष्ट्रवादीच्या फूटीवर बोलत असतील, तर त्या विषयावर या दोन्ही पक्षांचे एवढे एकमत कसे?? याविषयी देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शंका तयार झाली आहे.

    Sharad Pawar, ajit Pawar, supriya sule dropped the curtain on NCP split news, BJP state president chandrashekhar bawankule did the same

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!