• Download App
    पंतप्रधान मोदींनी १० दिवसांत घेतल्या किमान २१ आढावा बैठका, कोरोनाची लाट रोखण्यासाठी शर्थ।Second wave is most dangerous in India

    पंतप्रधान मोदींनी १० दिवसांत घेतल्या किमान २१ आढावा बैठका, कोरोनाची लाट रोखण्यासाठी शर्थ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगात रोज होणाऱ्या कोरोनाच्या मृत्यूंमध्ये तब्बल ४० ते ४५ टक्के बळी भारतात जात आहेत. नवीन रुग्णसंख्येबाबतही भारत जगात आघाडीवर आहे. प्रचंड वेगाने आलेल्या या कोरोनारुपी सुनामीमुळे केंद्र आणि राज्यांच्या साऱ्या यंत्रणा कोलमडली आहे. औषधे आणि लसीकरणातही असाहाय्य स्थिती झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सारी सूत्रे हाती घेतली आहेत. मोदी यांनी मागील १० दिवसांत किमान २१ आढावा बैठका घेतल्या आहेत. Second wave is most dangerous in India



    देशातील मृत्यूदर व नव्याने संसर्गाचा म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेटही सातत्याने वाढत आहे. मागच्या आठवड्यात दर शंभर लोकांमागे १७ ते १८ लोक बाधित होते. तो आकडा या आठवड्यात २१ ते २५ वर गेला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोरोना योद्धे, राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करून ही लाट रोखण्याचे उपाय करीत आहेत. मागील २४ तासांत जगातील ८.९२ लाखपैकी जवळपास म्हणजे म्हणजे ३.८६ लाख नवे रुग्ण भारतामध्ये आढळले. १५,१४२ बळींत भारतातील सर्वाधिक ३,५०१ लोकांचा समावेश आहे. अर्थात ही आकडेवारी केवळ सरकारी आहे. देशातील बहुतेक स्मशाने आणि दफनभूमीतील चित्र वेगळेच असल्याचे सार्वत्रिक मत आहे.

    Second wave is most dangerous in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते