• Download App
    44 people dead in Israel

    इस्राईलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार; धार्मिक उत्सव साजरा करताना दुर्घटना

    44 people dead in Israel

    विशेष प्रतिनिधी

    जेरुसलेम – इस्राईलमधील माउंट मेरॉनवर ‘लाग बीओमर’ हा धार्मिक उत्सव साजरा होत असताना चेंगराचेंगरी होऊन ४४ भाविकांचा मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले. इस्राईलमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने तेथे खुल्या जागेत मास्क घालण्याची सक्ती आणि अन्य काही निर्बंध उठविण्यात आले होते. 44 people dead in Israel

    गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर साजरा होणारा ‘लाग बीओमर’ हा पहिलाच सार्वजनिक उत्सव असल्याने माउंट मेरॉनवर काल सायंकाळी एकच गर्दी झाली होती. त्यात युवकांचा विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती.



    कोरोनाचे निर्बंध धुडकावून लाखो भाविक माउंट मेरॉनवर जमलेले असताना ही दुर्घटना मध्यरात्री घडली. ‘लाग बीओमर’ हा इस्राईलमधील परंपरावादी ज्यू धर्मीयांचा प्रमुख धार्मिक उत्सव आहे. हिब्रू महिना आयरच्या १८ व्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.

    काल रात्रभर शेकोटी, प्रार्थना आणि नृत्य असे कार्यक्रम सुरू असतानाच चेंगराचेंगरी होऊन ४४ जणांचा मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. माउंट मेरॉनवर काल एक लाख नागरिक जमले होते. आणखी एक लाख लोक आज सकाळी येणार होते, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

    चेंगराचेंगरी कशी झाली याबद्दल पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात काही जण निसरड्या वाटांवरून घसरून पडले. त्यांच्या अंगावर अनेक जण पडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण तेथून निसटण्याचा प्रयत्न करीत असल्याने चेंगराचेंगरी झाली, असे निदर्शनास आले.

    44 people dead in Israel

    Related posts

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    अमेरिकेने युक्रेनला गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली; रशियात 300 किमीपर्यंत हल्ल्यास सक्षम

    भारताशी व्यापार सुरू करण्याची पाक व्यावसायिकांची मागणी; PM शाहबाज शरीफ यांच्यावर आणला दबाव