गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांवर पोहोचला आहे. हाच गॅस सिलिंडर नोव्हेंबर २०२० मध्ये ५९४ रुपयांना मिळायचा.Rs 300 subsidy on gas cylinder; Link to bank account today Aadhar card!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्व सामान्यांची कंबर मोडली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर देखील आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांवर पोहोचला आहे. हाच गॅस सिलिंडर नोव्हेंबर २०२० मध्ये ५९४ रुपयांना मिळायचा.
सबसिडीच्या रक्कमेत वाढ
वाढत्या सबसिडीची रक्कम घरगुती सिलिंडरच्या रकमेत केंद्र सरकारने वाढ केली आहे.आधी प्रति गॅस सिलिंडर १५३.८६रुपये सबसिडी मिळत होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. प्रति सिलिंडर २९१.४८रुपये सबसिडी दिली जात आहे. विशेष म्हणजे, तुमच्याकडे उज्ज्वला योजनेंतर्गत कनेक्शन असेल तर तुम्हाला ३१२.४८ रुपयांपर्यंत सबसिडी मिळेल.
आधी सबसिडीची रक्कम १७४.८६ रुपये इतकी होती.कसे बचत कराल ३०० रुपये गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आधी तुम्हाला बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल.
एलपीजी कनेक्शन आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे
जर तुमचं एलपीजी कनेक्शन आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही घरबसल्या आधार कार्ड लिंक करू शकतात. इंडेन गॅस कंपनीचे ग्राहक https://cx.indianoil.in वर क्लिक करून सविस्तर माहिती घेऊ शकतात.
भारत गॅस कंपनीचे ग्राहक https://ebharatgas.com वर क्लिक करून एलपीजी कनेक्शन आधार कार्ड लिंक करू शकतात.मोबाइल App Paytm च्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा गॅस सिंलिडर बुकिंग करत असाल तर तुम्हाला १०० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.
Rs 300 subsidy on gas cylinder; Link to bank account today Aadhar card!
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल