• Download App
    Robin Khud : मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीची भारतात तब्बल ३००००० कोटींची गुंतवणूक!!, मोदींच्या भेटीत फैसला!!

    Robin Khud : मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीची भारतात तब्बल ३००००० कोटींची गुंतवणूक!!, मोदींच्या भेटीत फैसला!!

    नाशिक : मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीने भारतात तब्बल ३००००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या मूळच्या बांगलादेशी नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहीर केला. रॉबिन खुदा असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून त्याची ऑस्ट्रेलियात एअर ट्रंक नावाची डेटा सेंटर कंपनी आहे. हीच कंपनी भारतात तब्बल ३००००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारताच्या डिजिटल इकोसिस्टीमला बळकटी देणार आहे. Robin Khud

    रॉबिन खुदा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भारतात प्रचंड गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मोदींनी सुद्धा त्यांच्या संकल्पाला मान्यता दिली. मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंट वर या भेटीचे फोटो आणि माहिती शेअर केली.

    – मोदींचे ट्विट असे :

    भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासाला आता चांगलीच गती मिळाली आहे. एअरट्रंकने भारतात सुमारे ३ लाख कोटी रुपये (३० अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्याची आणि ५ गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या परिसंस्थेतील ही सर्वात मोठ्या प्रस्तावित गुंतवणुकींपैकी एक आहे. अशा गुंतवणुकींमुळे क्लाउड कंप्युटिंग आणि एआयसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, स्थानिक पुरवठा साखळीला पाठिंबा मिळेल आणि नवोन्मेष-आधारित विकासाला गती मिळेल. हे स्पष्ट आहे की जगाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे भविष्य अधिकाधिक भारतातच घडविले जात आहे!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल रॉबिन खुदा यांनी आभार मानले. रॉबिन खुदा म्हणाले, AI ची शर्यत आता केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती पायाभूत सुविधांशी संबंधित आहे. दीर्घकालीन डिजिटल पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसाठी भारत जगातील सर्वांत आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. भारताने हे स्पष्ट केले आहे की, तो त्या गुंतवणुकीसाठी स्पर्धा करण्यास तयार आहे, आणि म्हणूनच आम्ही आमच्या कंपनीच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या डिजिटल पायाभूत सुविधा कार्यक्रमांपैकी एकावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्या कार्याचा विस्तार हा भारतावरील आमच्या वाढत्या विश्वासातून झाला आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही बाजारात प्रवेश केला होता, त्यावेळच्या तुलनेत आज भारताने दिलेली संधी अधिक मोठी आणि व्यापक आहे.

    – मूळचे बांगलादेशी नागरिक, ऑस्ट्रेलियात कंपनी

    रॉबिन खुदा हे मूळचे बांगलादेशातले नागरिक असून त्यांचे शिक्षण बांगलादेशाची राजधानी ढाक्यामध्ये झाले. वयाच्या 18 व्या वर्षी ते अकाउंटन्सीच्या अभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. तिथेच त्यांनी एअर ट्रंक नावाची डेटा सेंटर कंपनी सुरू केली. तिचे बाजारमूल्य आज 210 कोटी अमेरिकन डॉलर्स असून जगातल्या सगळ्यांत मोठ्या डेटा सेंटर कंपन्यांपैकी ती एक कंपनी मानली जाते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीवर विश्वास ठेवून त्यांना भारतात मोठी गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या गुंतवणुकीतून भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि डिजिटल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहण्याची अपेक्षा आहे.

    Australian company owned by a Bangladeshi national to invest a massive ₹3 lakh crore in India; decision finalized during meeting with Modi!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RBI Monetary Policy : आरबीआयचा मोठा निर्णय! रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम; महागाई नियंत्रण आणि रुपयाच्या स्थैर्यावर भर

    Karnataka : ‘हे खाते नको, नाहीतर राजीनामा देईन’; कर्नाटकातील वरिष्ठ मंत्र्यांचा इशारा, काँग्रेसमध्ये नव्या वादाची चिन्हे

    Lalit Modi : दाऊदने IPL ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता? ललित मोदींचा खळबळजनक दावा; “तुझे काम संपले”, अशी धमकी दिल्याचा आरोप