• Download App
    पुढील पिढीसाठी पृथ्वीला सदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन| responsibility to keep the earth strong for the next generation, states Prime Minister Narendra Modi

    पुढील पिढीसाठी पृथ्वीला सदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    पुढील पिढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. responsibility to keep the earth strong for the next generation, states Prime Minister Narendra Modi


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पुढील पिढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

    संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत होते. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्राची ही बैठक वाढणारे वाळवंट, मोठ्या प्रमाणावर होत असलेली जमिनीची धूप, जमिनीचा ºहास आणि दुष्काळ या तीन मुद्द्यांवर केंद्रीत होती.



    मानवामुळे भूमीचे मोठे नुकसान झाले असून, ती चूक दुरुस्त करण्याची सामूहिक जबाबदारी आपली आहे. जमिनीच्या ऱ्हासाचा  परिणाम जगाच्या दोन तृतीयांश भागावर झाला असून, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा मोठा प्रभाव समाज, अर्थव्यवस्था, खाद्य सुरक्षा, संरक्षण आणि गुणवत्ता पडणार आहे. जमीन, स्रोत आणि संसाधने यांचा होणारा ऱ्हास  कमी करणे आपली प्राथमिकता असली पाहिजे.

    पंतप्रधान म्हणाले,  भारताने धरित्रीला नेहमी महत्त्व दिले आहे. भारतात धरती पवित्र मानली जाते. एवढेच नव्हे, तर धरणीला मातेचे स्थान भारतात आहे. जमिनीच्या ऱ्हासाचा  मुद्दा भारतानेच सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर आणला.  भारतात अनेक ठिकाणी जमिनीचा पोत सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.

    जमिनीचा पोत सुधारला की, उत्पादन क्षमतेत वाढ होऊन चांगली गुणवत्ता कायम राहू शकते. याशिवाय खाद्य सुरक्षा आणि मिळकतीत यामुळे वाढ होऊ शकते. यासंबंधित काही उपाय, प्रयोग देशभरात करण्यात आले.

    सन २०३० पर्यंत २६ दशलक्ष हेक्टरवर झालेली जमिनीची झीज भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी अनेकविध प्रयोग, उपाय सुरू केले असून, यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण होण्यास मदत होईल.

    responsibility to keep the earth strong for the next generation, states Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे