• Download App
    शेअर बाजारात आलेली जोरदार तेजी म्हणजे धोकादायक बुडबुडा, रिझर्व्ह बँकेचा इशारा।RBI warns about Market Boom

    शेअर बाजारात आलेली जोरदार तेजी म्हणजे धोकादायक बुडबुडा, रिझर्व्ह बँकेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – ‘कोविड’च्या महासाथीमुळे देशात ‘लॉकडाउन’ जाहीर झाल्याने अर्थचक्राची चाके मंदावली आहेत. व्यापार-उद्योगावर विपरित परिणाम झाला आहे. मात्र याच काळात शेअर बाजारात तेजीचे वारे आहे. शेअर बाजारात सध्या आलेल्या या तेजीबद्दल रिझर्व्ह बँकेने धोक्याची घंटा वाजविली आहे. RBI warns about Market Boom

    २०२०-२१ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनात अंदाजे ८ टक्के घट झालेली असताना, दुसरीकडे देशातील शेअर बाजारात आलेली जोरदार तेजी म्हणजे धोकादायक बुडबुडा आहे, असे मत रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात व्यक्त केले आहे.



    मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘सेन्सेक्स’ने फेब्रुवारी २०२१ मध्ये ५२ हजार अंशांची विक्रमी पातळी ओलांडली होती. आताही तो ५१ हजार अंशांच्या वरच आहे.

    ‘जीडीपी’तील अंदाजे ८ टक्के घसरणीच्या पार्श्वभूमीवर ‘इक्विटी’ या ॲसेटच्या किमतीत झालेली मोठी वाढ ही बुडबुड्यासारखी धोकादायक ठरते, असे निरीक्षण रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

    सध्या ‘जीडीपी’चा दर देखील मोठ्या प्रमाणात घसरला आहे. असे सर्व विपरीत घडलेले असतानाही शेअर बाजारात मात्र तेजीचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. पहिल्या देशव्यापी ‘लॉकडाउन’च्या प्रारंभी (मार्च २०२०) शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला होता. पण त्यानंतरच्या अवघ्या १०-११ महिन्यांत तो दुपटीने वाढला.

    RBI warns about Market Boom

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे