• Download App
    Ram Mandir theft case put behind bars राम मंदिराच्या चोरीतले ८ आरोपी गजाआड; चंपत राय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे; त्यानंतर राम जन्मभूमी ट्रस्टच्या खुलासा!!

    राम मंदिराच्या चोरीतले ८ आरोपी गजाआड; चंपत राय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे; त्यानंतर राम जन्मभूमी ट्रस्टच्या खुलासा!!

    ram mandir

    वृत्तसंस्था

    अयोध्या, (उत्तर प्रदेश) : अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरातल्या देणगीच्या चोरीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून ८ आरोपींना गजाआड केले. बऱ्याच राजकीय सामाजिक आणि धार्मिक मंथनानंतर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले. या दोघांच्या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या कहाण्या सगळ्या प्रसार माध्यमांनी दिल्या. या सगळ्या प्रकारात हिंदू समाजाच्या श्रद्धेला धक्का बसला. गेल्या १५ दिवसांमध्ये श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने या संदर्भात कुठलेही अधिकृत भाष्य केले नव्हते.Ram Mandir theft case put behind bars

    या सगळ्या घोटाळ्यानंतर आज श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ (न्यास) ने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांची त्यावर सही आहे.



    – भविष्याविषयी निर्वाळा

    या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी त्यात म्हटले आहे की, “श्री राम मंदिराबाबत (अयोध्या) गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांमुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत व्यथित आणि दुःखी झालो आहोत. निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी आणि भाविकांना आश्वस्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ (न्यासा) चे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले आहेत. न्यास आपल्या आगामी बैठकीत या विषयावर चर्चा करेल. ज्या भाविकांनी प्रभू रामांना अर्पण करण्यासाठी चांदीच्या विटा आणि दागिने यांसारख्या वस्तू न्यासाच्या अधिकाऱ्यांकडे स्वतःहून सुपूर्द केल्या होत्या, त्यांना न्यास अशी ग्वाही देते की या वस्तू सुरक्षित आहेत आणि त्यांचा पूर्ण हिशोब ठेवण्यात आला आहे. भविष्यात अशी दुर्दैवी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलू, अशी खात्री आम्ही सर्वांना देतो.”

    Ram Mandir theft case put behind bars; Champat Rai and Anil Mishra resign; followed by a clarification from the Ram Janmabhoomi Trust!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jacob Zuma : दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्रपतींनी हरिद्वारमध्ये पूजा केली; सिद्धपीठातून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विजयाची कामना

    Congress Reshuffle : आगामी विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेस मोठ्या फेरबदलाच्या तयारीत; प्रियांका गांधी-सचिन पायलट यांना मिळणार ‘मोठी’ जबाबदारी

    Crude Oil : कच्चे तेल इराण युद्धापूर्वीचा दर 72 डॉलरवर; ऊर्जा तज्ज्ञांनी सांगितले- पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा दसऱ्यापर्यंतच मिळू शकतो