विशेष प्रतिनिधी
अयोध्या : Ram Mandir अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे.Ram Mandir
विश्वस्त नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, “मला चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याबाबत माहिती मिळाली आहे.”Ram Mandir
तत्पूर्वी, गुरुवारी रात्री उशिरा चंपत राय यांचे निकटवर्तीय रामशंकर यादव (उर्फ ‘टिन्नू’) यांच्यासह आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची १४ दिवसांची कोठडी मागणार आहेत.Ram Mandir
ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळी उशिरा याप्रकरणी पहिली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली. मात्र, या एफआयआरमध्ये चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्यासारख्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नावे नाहीत. ही चोरीची घटना सर्वप्रथम ७ जून रोजी उघडकीस आली होती. उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आणि एसआयटीने २३ जून रोजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांना आपला प्राथमिक अहवाल सादर केला.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव गट) देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ (X) वर विचारले, “उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी १ कोटी रुपये आणि ४ किलो वजनाची चांदीची वीट देणगी म्हणून दिली होती. इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याची कोणतीही पावती मिळाली नाही. ती वीट कुठे गेली? आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे!”
दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राम लल्लाचे दर्शन घेतले. ते म्हणाले – ज्यांनी हे महापाप केले, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. एफआयआर (FIR) केवळ एक दिखावा आहे. या प्रकरणी प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Ram Mandir Donation Scam: Champat Rai & Anil Mishra Resign From Trust
महत्वाच्या बातम्या
- EPFO : EPFOचे ऑनलाइन पोर्टल 26 ते 28 जूनदरम्यान बंद; PF काढणे, ट्रान्सफर आणि क्लेम प्रक्रियेवर परिणाम
- राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी टिन्नू यादवसह 8 आरोपींना रात्री उशिरा अटक; आज कोर्टात करणार हजर!!
- Nasrapur Case : नसरापूर खटला; आरोपी भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा; वाचा प्रकरणाची टाइमलाइन