• Download App
    राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींची पुण्यातील डॉक्टरांशी चर्चा|Rajiv Satav's health deteriorated;Rahul Gandhi's discussion with doctors in Pune

    राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींची पुण्यातील डॉक्टरांशी चर्चा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कोरोना झाला आहे. पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करून राजीव सातव यांच्या प्रकृतीची चौकशी केली.Rajiv Satav’s health deteriorated;Rahul Gandhi’s discussion with doctors in Pune

    कोरोनाची लागण झाल्याची माहिती राजीव सातव यांनी ट्विट करून २२ एप्रिलला दिली होती. “सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझ्या संपर्कात आलेल्यानी नियमांचं पालन करावे,” असं आवाहन त्यांनी केले होते.



    पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावले आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन जहांगीरमधील डॉक्टरांकडे राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती, असे वृत्त आहे.

    Rajiv Satav’s health deteriorated;Rahul Gandhi’s discussion with doctors in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    MUDA Scam : MUDA घोटाळ्यात ईडीने 34 मालमत्ता जप्त केल्या; माजी आयुक्तांवर 31 साइट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप

    MP Satnam Sandhu : खासदार सतनाम यांचे परराष्ट्र मंत्रालयाला पत्र- रशिया-युक्रेन युद्धात भारतीयांना जबरदस्ती ढकलले जात आहे, पंजाबी तरुण अडकले

    Supreme Court : अनक्लेम्ड मालमत्तेसाठी केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि आरबीआयकडून मागितले उत्तर