वृत्तसंस्था
जोधपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यावर टीका केल्यानंतर गेहलोत गटाच्या निशाण्यावर पायलट आले आहेत. आता गेहलोत यांचे निकटवर्तीय नगरविकास मंत्री शांती धारीवाल यांनी म्हटले की, आम्ही केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सचिन पायलट यांची भेट पाहिली आहे. धारीवाल म्हणाले की, अशोक गेहलोत काहीही चुकीचे बोलले नाहीत, ते बरोबर आहेत. सरकार पाडण्यात दोघांचाही सहभाग होता.Rajasthan government’s move towards a crisis like Maharashtra? Sachin Pilot again on the target of Gehlot group
दुसरीकडे काँग्रेस कार्यालयात अग्निवीर योजनेच्या विरोधात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी गेहलोत यांच्या पायलटवरील आरोपांबाबत विचारणा केली, मात्र दीपेंद्र हुड्डा यांनी यावर बोलण्यास नकार दिला, तर प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा यांनी सर्व काँग्रेस नेते एकत्र आहेत, 2023 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार, असल्याचे म्हटले.
सचिन पायलट यांनी दिले नाही प्रत्युत्तर
राहुल गांधींनी सचिन पायलटच्या संयमाचे कौतुक केल्यानंतर गेहलोत यांनी पायलटवर थेट हल्ला चढवल्याने राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले आहे. सचिन पायलट सोमवारी टोंकच्या दौऱ्यावर येत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावरील आरोपांवर ते उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, पायलट यांनी आपल्या समर्थकांना गेहलोत गटाच्या कोणत्याही चिथावणीला बळी पडू नका असे सांगितले आहे.
काय म्हणाले गेहलोत?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समेटानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर सर्वात मोठा हल्ला केला आहे. सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, सचिन पायलट केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह काँग्रेस सरकार पाडण्याच्या कटात सामील होते.
गेहलोत म्हणाले की, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी टेलिफोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्या आवाजाचा नमुना द्यावा. न्यायालयाने केंद्रीय मंत्र्यांनाही नोटीस बजावली आहे. फोनवरील संभाषणात आपला आवाज असल्याचेही त्यांनी दिल्लीत मान्य केले आहे. गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, सचिन पायलट थोडक्यात हुकले. याचा अर्थ दोन्ही लोक सरकार पाडण्यात मग्न होते.
Rajasthan government’s move towards a crisis like Maharashtra? Sachin Pilot again on the target of Gehlot group
महत्वाच्या बातम्या