• Download App
    किसान मोर्चाच्या आंदोलनामुळे पंजाब, हरियानामध्ये रेल्वे सेवा विस्कळीत |tiRail service disturbed in Punjab, Haryana

    किसान मोर्चाच्या आंदोलनामुळे पंजाब, हरियानामध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर सहा तासांचे रेल रोको आंदोलन केले. देशातील ५० गाड्यांना याचा मोठा फटका बसला.Rail service disturbed in Punjab, Haryana

    पंजाब, हरियानामध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. या दोन्ही राज्यांत १३० ठिकाणांवर रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.रेल्वेची कोणतीही वित्तहानी न करता हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन किसान मोर्चाकडून करण्यात आले होते.



    लखीपूमरमधील हिंसाचारात आठजणांचा मृत्यू झाला होता. रोहतक, पानिपत, कुरूक्षेत्र, कैथल, बहादूरगड, अंबाला, जालंधर, लुधियाना, चंडीगड, अमृतसर, जम्मू, मेरठ, गाझियाबाद, शामली, सहारनपूर आणि मुरादाबाद रेल्वे स्थानकांवर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले.

    Rail service disturbed in Punjab, Haryana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!