• Download App
    ९७ टक्के मुंबईकरांनी घेतला कोरोनावरील लशीचा पहिला डोस 97 percent people get vaccinated in Mumbai

    ९७ टक्के मुंबईकरांनी घेतला कोरोनावरील लशीचा पहिला डोस

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मुंबईतील ५५ टक्के नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण नऊ महिन्यांत पूर्ण झाले असून ९७ टक्के जणांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे.97 percent people get vaccinated in Mumbai

    मुंबईत आजवर १,३९,६६,७२६ नागरिकांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ८८,८७,८३४ पहिला डोस आणि ५०,७८,८९२ नागरिकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यात ८०,६९,५३३ एवढ्या पुरुषांनी लस घेतली आहे; तर या तुलनेत ५८,९३,८१३ महिलांनी लस घेतली.

    उर्वरित तीन टक्के नागरिकांना ऑक्टोबर अखेरीस पहिला डोस मिळेल. सुमारे एक कोटी लोकसंख्या लसीकरणासाठी पात्र आहे. यात पहिल्या फळीतील कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय अंथरुणाला खिळलेल्या ७,५८७ नागरिकांना लशीचा डोस मिळाला आहे.

    यासह, १८ ते ४४ वयोगटातील ७२,०६,६६९; तर ४५ ते ५९ वयोगटातील ३३,९७,८१६ आणि ६० वर्षांवरील २०,१३,७५५ जणांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत आहे. प्रत्येक प्रभागात टप्प्याटप्प्याने फिरते लसीकरण सुरू केले जात आहे.

    97 percent people get vaccinated in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    MPSC Online Exam : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा; ऑनलाइन परीक्षेचा निर्णय लांबणीवर, ऑगस्ट 2027 पासून होणार अंमलबजावणी

    Aditya Thackeray : इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले; आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; ‘100% शुद्ध पेट्रोलचा’ पर्याय देण्याची मागणी

    Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्याकांड; पोलिसांना चकवा देण्यासाठी सिया आणि चेतनने पाहिले जपानी व्हिडिओ! आधी ‘स्लो पॉयझन’ देण्याचा होता कट