• Download App
    काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनांनाही संपूर्ण पाठिंबा, राहुल गांधी यांचे खुले पत्र|Rahul Gandhi's open letter to the Congress for its full support to the future agitations of the farmers

    काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनांनाही संपूर्ण पाठिंबा, राहुल गांधी यांचे खुले पत्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणारे कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यावर निर्माण झालेल्या उन्मादाच्या लाटेवर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.Rahul Gandhi’s open letter to the Congress for its full support to the future agitations of the farmers

    शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनालाही संपूर्ण पाठिंबा देऊ, असे खुले पत्र राहूल गांधी यांनी लिहिले आहे.राहूल गांधी यांनी म्हटले आहे की, तीन नवे कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकरी आंदोलकांचा मोठा विजय झाला आहे. शेतकरी भविष्यात करणार असलेल्या इतर आंदोलनांनाही काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा राहील.



    शेतकऱ्यांचा लढा अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांची गुलामासारखी स्थिती करण्याचे कारस्थान पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. त्याऐवजी मोदींनी २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.

    आपला फायदा व तोटा कशात आहे हे शेतकऱ्यांना नीट कळते. राजकारणाचा उपयोग जनहितासाठी करायचा असतो. लोकशाहीमध्ये अहंकाराला जागा नसते, असेही त्यांनी म्हटले आहे.

    Rahul Gandhi’s open letter to the Congress for its full support to the future agitations of the farmers

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध