• Download App
    विरोधकांच्या ऐक्याबद्दल राहुल गांधी म्हणाले- आम्ही सर्व एक आहोत, शरद पवारांनी 2024च्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची घेतली भेट|Rahul Gandhi said about the unity of the opposition - We are all one, Sharad Pawar met the Congress leaders regarding the 2024 elections.

    विरोधकांच्या ऐक्याबद्दल राहुल गांधी म्हणाले- आम्ही सर्व एक आहोत, शरद पवारांनी 2024च्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची घेतली भेट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात विरोधी पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. याअंतर्गत गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. तत्पूर्वी, राहुल यांनी बुधवारी नितीशकुमार यांची भेट घेतली होती.Rahul Gandhi said about the unity of the opposition – We are all one, Sharad Pawar met the Congress leaders regarding the 2024 elections.

    बैठकीनंतर राहुल म्हणाले की, आम्ही सर्व एक आहोत. त्याचबरोबर देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकजुटीने लढण्यासाठी सज्ज आहोत, असे खरगे म्हणाले.



    शरद पवार म्हणाले- ममता आणि केजरीवाल यांच्याशीही बोलले पाहिजे

    सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा व्हावी, असे मला वाटते, असे शरद पवार म्हणाले. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशीही बोलले पाहिजे. आपण जाऊन त्यांच्याशी बोलावे. विरोधकांना एकत्र करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ.

    नितीश कुमार यांनी घेतली होती राहुल गांधींची भेट

    नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी यांची भेट घेतली. बैठकीनंतर नितीश आणि राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीश कुमार म्हणाले की, आमच्या विरोधी ऐक्याबाबत चर्चा झाली आहे. जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. राहुल गांधी म्हणाले की, नितीशजींचा पुढाकार खूप चांगला आहे. विरोधकांना एकत्र करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.

    काँग्रेसला सोबत घेण्याची नितीश यांची इच्छा

    या नेत्यांची भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आज विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत काही पाऊल उचलले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार हे यापूर्वीही विरोधी ऐक्याचे समर्थक राहिले आहेत. यापूर्वीही ते काँग्रेसला सोबत घेण्याचे बोलत होते.

    काही विरोधी पक्ष त्यांच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. नितीश यूपीएचे घटक पक्ष वाढवू शकतात, असे आरजेडी आणि काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. नितीशकुमार विरोधी पक्षांना काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राजी करू शकतात. पंतप्रधानपदाचा दावा करण्याबाबत, नितीश यांनी आधीच सांगितले आहे की, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच नेते निवडले जातील.

    Rahul Gandhi said about the unity of the opposition – We are all one, Sharad Pawar met the Congress leaders regarding the 2024 elections.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती