विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी लंडन दौऱ्यावरून भारतात परतले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अदानी वरून पुन्हा सुरू झाले. लंडन दौऱ्यावरून काल भारतात परतल्यानंतर राहुल गांधी आज दुपारी संसदेत पोहोचले. पण ते संसदेत पोहोचल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार एकाच मिनिटातच लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या सभापतींना भेटून आपले मत मांडू देण्याची विनंती केली आहे. आता सभापतींनी परवानगी दिली की राहुल गांधी उद्या लोकसभेत भाषण करणार आहेत.Rahul Gandhi returned from London targets Narendra modi again over adani issue
पण राहुल गांधींनी आपल्या 7 दिवसांच्या लंडन दौऱ्यामध्ये केंब्रिज पासून इतरत्र सगळीकडे भारतात लोकशाही नाही. लोकशाही मूल्य उरली नाहीत. लोकशाही व्यवस्था धोक्यात आहेत, वगैरे वगैरे मुद्दे मांडून जोरदार भाषणे केली होती.
राहुल गांधींच्या या भाषणावरून संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताच भाजपने त्यांना घेरले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत भाषण करताना, राहुल गांधी देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन केली. त्यांनी संसदेच्या पटलावर येऊन माफी मागितली पाहिजे, अशी सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर भाजपने एकापाठोपाठ एक अशा तोफा त्यांच्यावर डागल्या. या तोफांना काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर मिळाले. सगळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या वक्तव्याभोवती एकवटले. भारतातल्या लोकशाही बद्दल परदेशात बोलले तर तो काय गुन्हा होतो काय??, हे नियम कुठून आणलेत?? असे अहवाल राहुल गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी संसदेबाहेर केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून सर्वच विरोधी सदस्यांनी राहुल गांधींच्या भाषणाचे संसदेत आणि संसदेबाहेर समर्थन केले.
मात्र स्वतः राहुल गांधी भारतात परतल्यानंतर ते आज लोकसभेत पोहोचतात, दुसऱ्या मिनिटाला कामकाज स्थगित झाले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या सभापतींची भेट घेऊन आपले म्हणणे मांडू द्यायची विनंती केली.
त्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आपल्या जुन्याच आरोपांची टेप लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी उपस्थित केलेल्या अदानीच्या मुद्द्यावर बोलायला घाबरतात. त्यांनी आपले आणि अदानींचे नाते एकदा जाहीरपणे सांगावे, असे आव्हान दिले. त्याचबरोबर सभापती कदाचित आपल्याला लोकसभेत बोलू देणार नाहीत, अशी शंका देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. याखेरीज पत्रकार परिषदेत बाकी कोणतेच मुद्दे हायलाईट झाले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी परदेशात गेले, तेव्हा भारतीय लोकशाही वर बोलले आणि भारतात परतल्यानंतर अदानी मुद्द्यावर पुन्हा सुरू झाले!!
Rahul Gandhi returned from London targets Narendra modi again over adani issue
- स्वतःहूनच पायउतार झालेल्या सरकारला परत कसे आणणार??; सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला परखड सवाल
- देवेंद्र आणि अमृता फडणवीसांना लाचखोरीत ट्रॅप करण्याचे बड्यांचे षडयंत्र; फडणवीसांनी विधानसभेत नावे न घेता केले धक्कादायक खुलासे
- Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आता आणखी वाट नाही पाहावी लागणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मूर्तीची प्रतिष्ठापना!
- Cheetah Helicopter Crashed: अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले