• Download App
    लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका|Rahul Gandhi lashes on Narendra Modi

    लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील लस, ऑक्सिजन टंचाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गायब झाल्याचा टोला लगावला आहे.Rahul Gandhi lashes on Narendra Modi

    काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयने काल गृहमंत्री अमित शाह हरविल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आज राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींवर शरसंधान केले.



    आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर, जीएसटी आणि इतरत्र पंतप्रधानांचे फोटो उरले आहेत, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले.तर, अन्य एका ट्विटद्वारे त्यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

    संपूर्ण देश संकटात असताना लोकांकडून घेतले जात आहे की दिले जात आहे हे सरकारने स्वतःला विचारायला हवे. सरकार मात्र स्वतःच्या जबाबदारी पासून पळ काढत आहे.

    त्यामुळे गरजूंसाठी आता लोकांनीच एकत्र येऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा. भारताने एकजुटीने उभे राहावे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

    Rahul Gandhi lashes on Narendra Modi

    Related posts

    ChatGPT : चॅटजीपीटी AI फोन लॉन्च करू शकते; अ‍ॅपल रोबोटपासून चॅटजीपीटी पिनपर्यंत; आता एआय गॅजेट्सची शर्यत

    आता PF काढणे होणार ATM आणि UPIइतके सोपे! EPFOच्या नव्या सुविधेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

    Global Food : जगभरात खाद्यपदार्थ 3 वर्षांत सर्वात महाग; अमेरिका-इराण युद्धामुळे पुरवठा साखळी तुटण्याचा परिणाम, UNने म्हटले- आणखी वाढतील दर