• Download App
    लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका|Rahul Gandhi lashes on Narendra Modi

    लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील लस, ऑक्सिजन टंचाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गायब झाल्याचा टोला लगावला आहे.Rahul Gandhi lashes on Narendra Modi

    काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयने काल गृहमंत्री अमित शाह हरविल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आज राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींवर शरसंधान केले.



    आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर, जीएसटी आणि इतरत्र पंतप्रधानांचे फोटो उरले आहेत, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले.तर, अन्य एका ट्विटद्वारे त्यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

    संपूर्ण देश संकटात असताना लोकांकडून घेतले जात आहे की दिले जात आहे हे सरकारने स्वतःला विचारायला हवे. सरकार मात्र स्वतःच्या जबाबदारी पासून पळ काढत आहे.

    त्यामुळे गरजूंसाठी आता लोकांनीच एकत्र येऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा. भारताने एकजुटीने उभे राहावे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

    Rahul Gandhi lashes on Narendra Modi

    Related posts

    Zubeen Garg : गायक जुबीन गर्ग प्रकरणात 3500 पानांचे आरोपपत्र दाखल; पुरावे चार ट्रंकमध्ये भरून न्यायालयात आणले

    काँग्रेसने लावली कम्युनिस्टांच्या अखेरच्या गडाला घरघर ही खरी केरळ मधली बातमी!!

    Shashi Tharoor : राहुल यांच्या खासदारांसोबतच्या बैठकीला थरूर अनुपस्थित; सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर