वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने आणि गुजरात हायकोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र त्या शिक्षेची कारणे पुरेशी दिली नाहीत, या एकमेव कारणावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कायद्याच्या नजरेत ते आजही दोषीच आहेत, असा स्पष्ट खुलासा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी यांनी केला आहे. महेश जेठमलानी हे पूर्णेश मोदी यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात केस लढवत आहेत. Rahul Gandhi is guilty in the eyes of the law
राहुल गांधींच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. अनेक नेत्यांनी या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधून घेतला आहे. पण या खटल्यातली कायदेशीर वस्तूस्थिती मात्र महेश जेठमलानी यांनी स्पष्ट शब्दांत समोर आणली आहे.
महेश जेठमलानी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेच्या अंमलबजावणीवर आधीच स्थगिती दिली होती. आज त्यांनी कनिष्ठ नेते न्यायालयांनी सुनावलेल्या शिक्षेला पुरेशी कारणे दिले नसल्याचे सांगून तशी कारणे द्यायला हवी होती, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर राहुल गांधी आजही दोषीच आहेत. आता यापुढे सेशन कोर्टात खटला चालेल. त्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीत जास्त शिक्षा सुनावल्याने त्याची कारणे सेशन कोर्टाला द्यावी लागतील. राहुल गांधींच्या दोषसिद्धीवर स्थगिती असल्याने ते संसदेत येऊ शकतील, पण कायद्याच्या कसोटीवर दोषीच राहतील. सेशन कोर्टात आणि नंतर वरिष्ठ न्यायालयांमध्ये खटले चालून त्याविषयीचा निर्णय नंतर होईल. मॅजिस्ट्रेट कोर्टाने राहुल गांधी दोषी असल्याचा आणि त्यांना शिक्षा दिल्याचा निर्णय योग्यच आहे. पण केवळ सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात, एवढाच आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मर्यादित अर्थ आहे.
याचा अर्थ काँग्रेसमध्ये जरी राहुल गांधींच्या कथेत सुटकेचा जल्लोष झाला असला तरी प्रत्यक्षात राहुल गांधी आजही कायद्याच्या कसोटीवर दोषीच आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सर्व खटला चालविल्यानंतर जर सेशन कोर्टाची आणि त्या आधीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाची शिक्षा कायम ठेवली, तर राहुल गांधींची खासदारकीही रद्द होऊ शकते.
Rahul Gandhi is guilty in the eyes of the law
महत्वाच्या बातम्या
- Uttarakhand Landslide : गौरीकुंडमध्ये भूस्खलन ढिगाऱ्याखाली चार मृतदेह आढळले, १५ बेपत्तांचा शोध सुरू
- ड्रॅगनला दणका, केंद्र सरकारची लॅपटॉप-टॅब्लेट-पीसी आयातीवर बंदी; मेक इन इंडिया उत्पादनाला चालना मिळणार
- १७ वर्षीय डी.गुकेश बनला भारताचा अव्वल बुद्धिबळपटू! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला टाकले पिछाडीवर
- साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट!