विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारतात कोरोना आटोक्यात येत असल्याचे वातावरण तयार झाले होते. परंतु या विषाणूच्या एका नवीन प्रकाराने जगात प्रवेश केला आहे. ओमिक्रोन व्हेरीएंट या नावाचा कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार जगभरात होत असल्याने परत वातावरण बिघडले आहे. केंद्र सरकारने याची दखल घेऊन राज्यांना प्रतिबंधक सूचना दिल्या आहेत. परंतु राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर या नवीन विषाणूबाबत टिका केली आहे.
Rahul Gandhi criticizes PM Modi over Corona
कोरोना लसीकरणाचे अपयश एका व्यक्तीचे फोटो लावून दिर्घकाळ लपवता येणार नाही अशी टीका पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की भारतातील जनतेला या विषाणूच्या प्रसाराचा धोका आहे.
राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे देशातील नागरिकांना धोका आहे. केंद्र सरकारकडून आता अधिक गंभीरपणे नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कोरोना लसीकरणाची देशातील स्थिती वाईट असून ती एका व्यक्तीच्या फोटो मागे दिर्घकाळ लपवता येणार नाही.”
राहुल गांधी म्हणाले की मागील आठवड्यात रोज फक्त ६८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाची गती संथ आहे. रोज अडीच कोटी लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
Rahul Gandhi criticizes PM Modi over Corona
महत्त्वाच्या बातम्या
- आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल
- छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार
- ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना