विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Radhakrishnan सी. पी. राधाकृष्णन यांचा आज उपराष्ट्रपती पदावर शपथविधी झाला. यावेळी राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलै नंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.Radhakrishnan
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, हमीद अन्सारी यांच्यासह जगदीप धनखड हे माजी उपराष्ट्रपती पहिल्या रांगेत हजर होते. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सुदेश देखील हजर होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/Z6IkOLODAy…
पण आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये जगदीप धनखड यांच्या उपस्थितीची चर्चा सर्वाधिक रंगली. कारण 21 जुलै 2025 रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यांनी तब्येतीच्या कारणासाठी राजीनामा दिल्याचे सांगितले गेले होते, पण त्यामागे राजकीय मतभेद असल्याची राजकीय वर्तुळात फार मोठी चर्चा होती. मोदी सरकारशी मतभेद झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते गप्प बसले. ते कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका देखील मांडली नव्हती त्यामुळे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले होते.
सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर जगदीप धनखड यांनी यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. या पत्राच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. परंतु स्वतः जगदीप धनखड त्यावेळी देखील समोर आले नव्हते किंवा त्यांनी मीडियाला बाईट दिला नव्हता. पण आज मात्र शपथविधी समारंभात हे राष्ट्रपती भवनात हजर राहिले. त्यांच्या उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
Radhakrishnan’s swearing-in ceremony as Vice President; Jagdeep Dhankhar participates in a public event for the first time after July 21!!
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
- Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश
- Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!
- याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!