• Download App
    ठोको तालीचा कॉँग्रेसला पंजाबमध्ये फटका, वरिष्ठ नेत्यांनी पराभवाचे खापर फोडले नवज्योत सिंग सिध्दूंवर|Punjab, senior leaders lash out at Navjot Singh Sidhu

    ठोको तालीचा कॉँग्रेसला पंजाबमध्ये फटका, वरिष्ठ नेत्यांनी पराभवाचे खापर फोडले नवज्योत सिंग सिध्दूंवर

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव ठोको तालीमुळे म्हणजे नवज्योत सिंग सिध्दू यांच्यामुळेच झाला असल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी यांनी मंगळवारी माळव्यातील उमेदवारांशी संवाद साधला. आढावा बैठकीत सुखबिंदर सिंग रंधावा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.Punjab, senior leaders lash out at Navjot Singh Sidhu

    काँग्रेसच्या नेत्यांनी पराभवाचे खापर प्रदेश प्रभारी हरीश चौधरी, सुनील जाखड, नवज्योतसिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांच्या डोक्यावर टाकले. यांच्या अनावश्यक भाषणबाजीने काँग्रेसची ही अवस्था झाल्याचे सर्वांनी सांगितले.नवज्योतसिंग सिद्धू, चरणजितसिंग चन्नी आणि सुनील जाखड यांच्या अनावश्यक वक्तव्याने पाणी फेरले आहे.



    त्यामुळे काँग्रेसला आपले अस्तित्व वाचवणे कठीण जात आहे. हरीश चौधरी यांनी काँग्रेसची तिकिटे विकली, असा आरोप काही नेते करीत आहे. चंदीगडमध्ये राहून त्यांनी पक्षाची चिंता न करता स्वत:ची काळजी घेतली आणि हायकमांडला अंधारात ठेवले.

    पक्षाचे खासदारही पराभवासाठी सिद्धू आणि चन्नी यांच्यावर आरोप करीत आहेत. मोठ्या कष्टाने आपली जागा वाचवणाऱ्या सुखजिंदर रंधवाने सिद्धू यांनी काँग्रेसला धूळ चारली, असे म्हटले. दुसरे मंत्री राजिंदर तृप्त बाजवा म्हणाले की, सिद्धू ना कुणासोबत जायला तयार आहेत ना कोणाचे ऐकायला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

    विश्वास पराभवाला आपणच जबाबदार असून, माळवा विभागातील उमेदवारांची वन टू वन बैठकीत चर्चा करून पराभवाची कारणे शोधली जातील, असे हरीश चौधरी यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी सांगितले. मी प्रत्येक उमेदवारांशी वैयक्तिक बोलेन. प्रभारी असल्याने पराभवाची जबाबदारीही माझीच आहे.

    राज्यात काँग्रेसचा पराभव झाल्याने प्रत्येक उमेदवाराच्या चेहºयावर निराशा आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता. त्यांचा पक्ष हायकमांडवर जितका राग आहे तितकाच राग प्रदेश नेतृत्वाबद्दल आहे.बैठकीतच जाखड यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड मतांद्वारे करण्याची मागणीही केली. पक्षाचे प्रमुखपद बाहेरच्या व्यक्तीकडे सोपवण्याऐवजी पक्षातील विश्वासार्ह चेहरा निवडण्याचे आवाहन त्यांनी केले.

    Punjab, senior leaders lash out at Navjot Singh Sidhu

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!