नाशिक : काँग्रेसचे उत्तर प्रदेश मधले खासदार इम्रान मसूद यांनी प्रियांका गांधींच्या नेतृत्वाची सोंगटी पुढे ढकलली, नेमकी त्याच दिवशी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची “भविष्यवाणी” झाली. हा विलक्षण राजकीय योगायोग आज 23 डिसेंबर 2025 रोजी घडला.Prime ministrial race emergence between Rahul Gandhi and Priyanka Gandhi
– संसद अधिवेशनात प्रियांका गांधी जास्त ऍक्टिव्ह
संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधींपेक्षा प्रियांका गांधी जास्त ऍक्टिव्ह दिसल्या. त्यांनी वंदे मातरम आणि मनरेगा या दोन विषयांवर लोकसभेत जोरदार भाषण केले त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ आणि शॉर्ट्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. संसदेचे अधिवेशन ऐन मध्यावर आले असताना राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर निघून गेले. त्यामुळे माध्यमांचे संसद अधिवेशनात प्रियांका गांधी यांच्यावरच लक्ष केंद्रित राहिले. त्याचवेळी संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अन्य नेत्यांबरोबर एकत्र चहापान केले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांच्या दालनात घेतलेल्या या अनौपचारिक बैठकीचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सगळीकडे व्हायरल झाले. त्यामुळे प्रियांका गांधींचे नेतृत्व काँग्रेसने पुढे आणायला सुरुवात केली की काय, याची चर्चा संपूर्ण देशभर रंगली.
– प्रियांका गांधींच्या पंतप्रधान पदाची वकालत
या पार्श्वभूमीवर खासदार इम्रान मसूद पत्रकारांनी सवाल करताच त्यांनी जोरदार प्रत्युत्तर ठोकले. तुम्हाला वाटलं तर करा, प्रियांका गांधींना पंतप्रधान. मग बघा त्या बांगलादेशाला कसे उत्तर देतील. त्या इंदिरा गांधींच्या नात आहेत. इंदिरा गांधींनी जशी पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली, तशीच प्रियांका गांधी बांगलादेशाला अद्दल घडवतील, असे वक्तव्य इम्रान मसूद यांनी केले. पण त्यानंतर त्यांनी लगेच आपण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या फरक करत नसल्याचे सांगितले. कारण दोघेही इंदिरा गांधींची नातवंडे असल्याची मखलाशी सुद्धा त्यांनी केली.
पण इम्रान मसूद यांच्या तोंडून बाण सुटला होता. त्यांनी प्रियांका गांधींच्या पंतप्रधान पदाची वकालत केल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे काँग्रेसमध्ये वेगळीच राजकीय अस्वस्थता निर्माण झाली. अजून कशातच काही नसताना बहीण – भावातच पंतप्रधान पदाची स्पर्धा निर्माण झाली, तर आपणच अडचणीत येऊ, याची भीती अनेक काँग्रेस नेत्यांना वाटली.
– राहुल गांधींबाबत भविष्यवाणी
या पार्श्वभूमीवर आजच राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची “भविष्यवाणी” अचानक समोर आली. (की आणली गेली?) राहुल गांधी 100% काय, पण 110% पंतप्रधान होणार. त्यांच्या पत्रिकेत राजयोग आहेच, पण तो 2036 मध्ये ऍक्टिव्हेट होईल, असा दावा ज्योतिषी मनीष अग्रवाल यांनी केला. पुढच्या 10 वर्षांमध्ये अमित शाह यांच्या पत्रिकेत प्रबळ राजयोग आहे. पण 10 वर्षानंतर त्यांची पत्रिका कमकुवत होईल. त्यावेळी राहुल गांधींचे तारे चमकायला लागलेले असतील. त्याआधी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाची चमक दिसेल, पण ते 2036 मध्ये पंतप्रधान होतील, असे मनीष अग्रवाल म्हणाले.
– राजकीय योगायोग
मनीष अग्रवाल यांची ही भविष्यवाणी नेमकी आजच्याच योगायोगावर सगळीकडे प्रसिद्ध झाली. म्हणजे ज्या दिवशी खासदार इम्रान मसूद यांनी प्रियांका गांधी यांना पंतप्रधान करायची सोंगटी पुढे ढकलली, त्याच दिवशी राहुल गांधींच्या पत्रिकेतल्या पंतप्रधान पदाच्या राजयोगाची बातमी समोर आली. पण या सगळ्या घटनाक्रमात पत्रिकेतल्या राजयोगा पेक्षा राजकीय टायमिंगचा योगायोग मोठा ठरला.
Prime ministrial race emergence between Rahul Gandhi and Priyanka Gandhi
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी