कोरोना लाट आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदय या संकटांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार आहे. Prime Minister Narendra Modi’s visit to Italy will be from October 29 to 31
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मार्चमध्ये बांगलादेश दौरा झाला होता. त्यानंतर अलीकडे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेसाठी, क्वाड बैठकीसाठी अमेरिका दौरा झाला होता. दरम्यान, कोरोना लाट आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदय या संकटांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ते इटलीच्या दौऱ्यावर तसेच पर्यावरणाशी संबंधित बैठकीसाठी ब्रिटनलाही जाणार आहेत.
दरम्यान, त्यानंतर जी-२० बैठकीसाठी हा दौरा होत आहे. २९ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी इटलीच्या रोममध्ये पोहोचतील. कोरोनानंतर जागतिक आर्थिक व्यवस्थेत अपेक्षित असलेला सुधार, पुरवठा साखळी सुधारणे, पर्यावरण बदल, दहशतवाद यासारखे मुद्दे चर्चेसाठी जी-२० च्या कार्यक्रम पत्रिकेवर असून जी-२० च्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे एकाच व्यासपीठावर येतील.
याआधी मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंधाच्या मुद्द्यावर भेट झाली होती. शिवाय, क्वाड देशांच्या बैठकीच्या निमित्तानेही त्यांची चर्चा झाली होती. चीन आणि रशिया हे देशही जी-२० चे सदस्य असले तरी दोन्ही देशांचे प्रमुख अनुक्रमे शी जीनपिंग आणि पुतीन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, पर्यावरण बदलाशी संबंधित ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सहभागासाठी मोदी ग्लासगो येथे जाणार आहेत. यावेळी ते ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.
Prime Minister Narendra Modi’s visit to Italy will be from October 29 to 31
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत