मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून आढावा घेणार आहेत. ही बैठक दुपारी साडेचारच्या सुमारास होणार आहे.Prime Minister Narendra Modi will interact with the Chief Ministers of all the states today, Chief Minister Uddhav Thackeray will be absent; What is the reason?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून आढावा घेणार आहेत. ही बैठक दुपारी साडेचारच्या सुमारास होणार आहे.
मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत.त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री का उपस्थित राहणार नाहीत? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बरेच दिवस घरातून बाहेर पडलेले नाहीत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
Prime Minister Narendra Modi will interact with the Chief Ministers of all the states today, Chief Minister Uddhav Thackeray will be absent; What is the reason?
महत्त्वाच्या बातम्या
- राजीनाम्यांची हॅटट्रिक : यूपीमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, कॅबिनेट मंत्री धरमसिंह सैनी आणि आमदार विनय शाक्य यांचाही राजीनामा
- Manipur Elections : मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार सुरूच, काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर बॉम्बस्फोट
- UP Election 2022 : यूपी भाजपमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरूच, दोन दिवसांत सातवा राजीनामा, आता मुकेश वर्मा यांची पक्षाला सोडचिठ्ठी
- पाच राज्यांच्या निवडणुकात प्रचार अजून दूर; ट्विटरवर मात्र वॉर!!; बहुजन समाज पक्ष काँग्रेस जोरात!!