• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर नेत्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र, डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी केले कौतुक|Prime Minister Narendra Modi was hailed by the Prime Minister of Denmark as a source of inspiration for other world leaders

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर नेत्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र, डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, अशा शब्दांत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना डेन्मार्कला येण्याचं आमंत्रणही दिलं.Prime Minister Narendra Modi was hailed by the Prime Minister of Denmark as a source of inspiration for other world leaders

    डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मेट फ्रेडरिक्सन यांचं औपचारिकरित्या स्वागत करत आदरातिथ्य केले. फ्रेडरिक्सन ११ आॅक्टोबरपर्यंत भारत दौºयावर दाखल झाल्या आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली विमानळावर मेट फ्रेडरिक्सन यांचं स्वागत केले. फ्रेडरिक्सन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेट फ्रेडरिक्सन यांच्या द्विपक्षीय चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेदेखील सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट यांचं स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत सोहळा पार पडला.



    फ्रेडरिक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. यात आरोग्य, कृषी, जल व्यवस्थापन, हवामान बदल आणि नूतनीकरणीय ऊर्जा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला.

    चचेर्नंतर पंतप्रधान मोदी यांनी एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बैठकीत भारत-डेन्मार्क ग्रीन धोरणात्मक भागीदारी अंतर्गत केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन अनेक क्षेत्रांमध्ये संपूर्ण सहकार्याच्या आणखी विस्तारावर चर्चा केली. या चचेर्नंतर दोन्ही देशांमध्ये चार महत्त्वाचे करार करण्यात आले.

    यात विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान बदल आणि कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा समावेश आहे.आभासी शिखर परिषदेत भारत आणि डेन्मार्क यांच्यात ग्रीन धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

    या दोन्ही देशांद्वारे दूरगामी विचार आणि पर्यावरणाबद्दल आदर दर्शवणारे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच भारतातील कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी कार्यक्षम पुरवठा साखळी, स्मार्ट जलसंपत्ती व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानासारह्यया क्षेत्रात सहकार्य करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Prime Minister Narendra Modi was hailed by the Prime Minister of Denmark as a source of inspiration for other world leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!