• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर : संत तुकाराम महाराज मंदिराच उद्घाटन, असे आहे वेळापत्रक|Prime Minister Narendra Modi to visit Maharashtra on June 14 Inauguration of Sant Tukaram Maharaj Temple is the schedule

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर : संत तुकाराम महाराज मंदिराच उद्घाटन, असे आहे वेळापत्रक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते जलभूषण भवन, मुंबईतील क्रांतिकारक दालन आणि पुण्यातील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, 200 वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.Prime Minister Narendra Modi to visit Maharashtra on June 14 Inauguration of Sant Tukaram Maharaj Temple is the schedule

    पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात पंतप्रधान दुपारी १.४५ वाजता देहू येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करतील. मंदिराचे बांधकाम 36 शिखरांसह बांधलेले आहे आणि त्यात संत तुकारामांची मूर्तीदेखील आहे.



    गॅलरीचे उद्घाटनही करणार

    पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान त्याच दिवशी राजभवनात जलभूषण भवन आणि क्रांतिकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन करतील. 1885 पासून जलभूषण हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. ही इमारत जुनी झाल्यानंतर ती पाडून नवीन इमारत बांधण्यात आली. या नवीन इमारतीची पायाभरणी राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये करण्यात आली होती.

    कार्यक्रमाच्या यादीत यानंतर पंतप्रधान मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवालाही उपस्थित राहणार आहेत. मुंबई समाचार साप्ताहिकाची छपाई फरदुनजी मरजबानजी यांनी १ जुलै १८२२ रोजी सुरू केली. जे १८३२ मध्ये दैनिक बनले होते. हे वृत्तपत्र गेली 200 वर्षे सातत्याने प्रकाशित होत आहे. या अनोख्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी याप्रसंगी टपाल तिकीटही जारी करण्यात येणार आहे.

    Prime Minister Narendra Modi to visit Maharashtra on June 14 Inauguration of Sant Tukaram Maharaj Temple is the schedule

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य