• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार|Prime Minister Narendra Modi thanked Russian President Vladimir Putin

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार

    स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले आहेत.Prime Minister Narendra Modi thanked Russian President Vladimir Putin


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. मोदी म्हणाले, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. आज माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्तम संभाषण झालं.



    आम्ही कोविड-१९ च्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. करोनाच्या साथीविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढ्याला मदत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    पंतप्रधान म्हणाले, आम्ही दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी देखील चर्चा केली. यात प्रामुख्याने अंतराळ संशोधन आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्राविषयी देखील चर्चा झाली. या संकटाविरुद्धच्या लढ्यामध्ये स्पुटनिक व्ही लसीबाबत झालेलं आमचं सहकार्य नक्कीच मानवजातीला मदत करेल.

    रशिया आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ मिळण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये मंत्रीस्तरावर चर्चा सुरू करण्यावर सहमती केली आहे.

    Prime Minister Narendra Modi thanked Russian President Vladimir Putin

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    New Income Tax : नवीन आयकर नियमांचा मसुदा जारी; नियमांची संख्या 511 वरून 333 पर्यंत कमी झाली; 1 एप्रिलपासून नवीन प्रणाली लागू

    PM Modi : मोदी म्हणाले- दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही; तमिळ भाषा भारत – मलेशियाला जोडते

    Dalai Lama : दलाई लामा कार्यालयाने एपस्टीन फाइल्सशी संबंध नाकारला; सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर खुलासा