स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले आहेत.Prime Minister Narendra Modi thanked Russian President Vladimir Putin
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. मोदी म्हणाले, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. आज माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्तम संभाषण झालं.
आम्ही कोविड-१९ च्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. करोनाच्या साथीविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढ्याला मदत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान म्हणाले, आम्ही दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी देखील चर्चा केली. यात प्रामुख्याने अंतराळ संशोधन आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्राविषयी देखील चर्चा झाली. या संकटाविरुद्धच्या लढ्यामध्ये स्पुटनिक व्ही लसीबाबत झालेलं आमचं सहकार्य नक्कीच मानवजातीला मदत करेल.
रशिया आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ मिळण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये मंत्रीस्तरावर चर्चा सुरू करण्यावर सहमती केली आहे.
Prime Minister Narendra Modi thanked Russian President Vladimir Putin
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, गिरीष महाजन यांचा आरोप
- अक्षय कुमार- ट्विंकल खन्नाचा मदतीचा हात, १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर करणार दान
- भारतीय कोव्हॅक्सिन लई भारी, विषाणूचे ६१७ प्रकार नष्ट करण्याची क्षमता, जयराम रमेश, शशी थरूर तोंडावर पडले
- परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल