पंतप्रधान मोदींचा बिकानेरमध्ये राजस्थानच्या काँग्रेसवर निशाणा
विशेष प्रतिनिधी
बिकानेर : तेलंगणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) राजस्थानमध्ये पोहोचले. गेल्या नऊ महिन्यांतील त्यांचा हा सातवा दौरा आहे. त्यांनी बिकानेरमध्ये २४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, राजस्थानने एक्सप्रेस वेच्या नावाने द्विशतक लगावले आहे. येथे आधुनिक विकासाच्या अपार शक्यता आहेत. Prime Minister Narendra Modi criticized Congress in Bikaner rally
भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी या वीरांच्या भूमीला, राजस्थानला नमन करतो. ही भूमी पुन:पुन्हा विकासासाठी वाहिलेल्या लोकांची वाटही पाहते आणि निमंत्रणेही पाठवते. विकासाच्या नवनवीन भेटवस्तू, या वीरभूमीच्या चरणी समर्पित करण्यासाठी देश सतत प्रयत्नशील आहे.
मोदी पुढे म्हणाले की, राजस्थान हे अफाट क्षमता आणि शक्यतांचे केंद्र आहे. राजस्थानमध्ये औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे आम्ही येथील कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा हायटेक करत आहोत. वेगवान द्रुतगती मार्ग आणि रेल्वेमुळे संपूर्ण राजस्थानमध्ये पर्यटनाशी संबंधित संधीही वाढतील. याचा सर्वात मोठा फायदा इथल्या तरुणांना, राजस्थानच्या मुला-मुलींना होणार आहे. ते म्हणाले की, आज ज्या ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन झाले आहे, हा कॉरिडॉर राजस्थानला हरियाणा, पंजाब, गुजरात आणि जम्मू-काश्मीरशी जोडेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकांचा उत्साह सांगत आहे की, राजस्थानमध्ये केवळ हवामानाचे तापमान वाढले नाही, तर काँग्रेस सरकारविरोधात लोकांचा रोषही वाढला आहे. जनतेचे पारा चढला की, सत्तेची गरमी कमी व्हायला आणि सत्ता बदलायला वेळ लागत नाही. याचबरोबर ते म्हणाले की, आम्ही दिल्लीहून राजस्थानला योजना पाठवतो, पण जयपूरमध्ये काँग्रेसने त्यांच्यावर पंजा मारला. काँग्रेसला राजस्थानच्या समस्या आणि तुमच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या भाजपच्या योजनेमुळे काँग्रेस सरकारही हैराण झाले आहे.
Prime Minister Narendra Modi criticized Congress in Bikaner rally
महत्वाच्या बातम्या
- 72 हुरें चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा; सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या
- बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप
- राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!
- Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!