विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. केंद्रीय नेते नारायण राणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.Prime Minister Narendra Modi became the world’s number one popular leader
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, खरंच हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील लोकमान्यता असलेल्या नेत्यांमध्ये तब्बल 77% रेटिंग मिळालं आहे. यामुळे ते पुन्हा एकदा ते सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरले.
हे रेटिंग जून 2021 मधील 66% टक्क्यांवरून नोव्हेंबर 2021 मध्ये 70 टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता 77% वर आहे. यामुळे ही अभूतपूर्व वाढ आहे.गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले होते.
सर्वेक्षणात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 71% होते.अमेरिकन डेटा इंटेलिजेंस फर्म द मॉर्निंग कन्सल्ट प्रत्येक देशातील प्रौढांचे सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार करते.
Prime Minister Narendra Modi became the world’s number one popular leader
महत्त्वाच्या बातम्या
- अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- India – Japan – Kishida – Modi : भारतावरचा विश्वास वाढला; जपानची भारतात 3.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा!!
- आसनी’ चक्रीवादळामुळे काही ठिकाणी वादळ, पाऊस
- NCP – MIM Alliance : राष्ट्रवादीला आघाडीसाठी फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी!!; नितेश राणेंचा टोला