• Download App
    पंतप्रधान मोदींनी सात वर्षांत तर योगी आदित्यनाथांनी चार वर्षांत घेतली नाही एकही सुट्टी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले कौतुक|Prime Minister Modi has not taken a single holiday in seven years while Yogi Adityanath has not taken a single holiday in four years, lauded Uttar Pradesh Deputy Chief Minister Dinesh Sharma

    पंतप्रधान मोदींनी सात वर्षांत तर योगी आदित्यनाथांनी चार वर्षांत घेतली नाही एकही सुट्टी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सांगितले.Prime Minister Modi has not taken a single holiday in seven years while Yogi Adityanath has not taken a single holiday in four years, lauded Uttar Pradesh Deputy Chief Minister Dinesh Sharma

    शर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात एक दिवसही सुट्टी न घेता सर्व वेळ जनतेच्या सेवेत घालवला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्यामुळेच देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत.



    खरा देशभक्त तोच आहे जो स्वत:साठी नाही तर समाजासाठी काम करतो आणि अशी व्यक्ती बदल घडवून आणण्यास सक्षम असते. भारतीय जनता पक्ष जात आणि पंथाच्या नावावर भेदभाव करत नाही. गेल्या साडेचार वर्षात सरकारने चालवलेल्या सर्व योजना प्रत्येक विभागासाठी लागू केल्या गेल्या आणि लोकांना त्याचा लाभ मिळाला.

    भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव करत नाही, म्हणूनच या सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात एकाही ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही. भाजप हा समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेण्यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. पक्षाने आधी शेतकरी, नंतर ओबीसी गट आणि आता समाजातील प्रबुद्ध घटकांसोबत बैठका घेतल्या असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

    Prime Minister Modi has not taken a single holiday in seven years while Yogi Adityanath has not taken a single holiday in four years, lauded Uttar Pradesh Deputy Chief Minister Dinesh Sharma

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!