• Download App
    पंतप्रधान मोदींनी ५१ हजार तरुणांना केले नियुक्ती पत्रांचे वाटप, देशभरात ४६ ठिकाणी पार पडले रोजगार मेळावे Prime Minister Modi distributed appointment letters to 51 thousand youth 

    पंतप्रधान मोदींनी ५१ हजार तरुणांना केले नियुक्ती पत्रांचे वाटप, देशभरात ४६ ठिकाणी पार पडले रोजगार मेळावे

     मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील तरुणांना मार्गदर्शन केले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्यांची भेट दिली. 9व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील ५१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे दिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी नियुक्ती पत्र मिळालेल्या तरुणांनाही संबोधित केले. यासोबतच त्यांनी युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Prime Minister Modi distributed appointment letters to 51 thousand youth

    यावेळी पीएम मोदी म्हणाले, “आजच्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी कठोर परिश्रमाने हे यश मिळवले आहे. या यशाचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांच्या नव्या आयुष्याचा शुभारंभ होत आहे.

    PM गतिशक्ती योजनेच्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची 56 वी बैठक, 52000 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांची शिफारस

    मंगळवारी 9व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेथून ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली.

    Prime Minister Modi distributed appointment letters to 51 thousand youth

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे