• Download App
    प्रशांत किशोर म्हणतात राहूल गांधींशी मतभेद, मोदींना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करण्यावर त्यांनी द्यावा भर|Prashant Kishor says differences with Rahul Gandhi, he should focus on rebuilding the party rather than defeating Modi

    प्रशांत किशोर म्हणतात राहूल गांधींशी मतभेद, मोदींना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करण्यावर त्यांनी द्यावा भर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कॉँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले आहे की कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्याशी माझे दोन विषयांवर मतभेद आहेत. पक्षाचे पतन होत आहे हे मान्य करायला ते तयार नाहीत.Prashant Kishor says differences with Rahul Gandhi, he should focus on rebuilding the party rather than defeating Modi

    दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करणे आवश्यक आहे, हे मी त्यांना सांगत आहे.प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, राहूल गांधी यांना वाटते की नरेंद्र मोदी यांना हरविणे हेच कॉँग्रेसचे पहिले लक्ष्य असायला हवे.



    त्यांना वाटते की मोदींना पराभूत केल्यावर कॉँग्रेसचा पुन्हा उदय होईल. परंतु, मला वाटते की जर ते ४८ वर्षांचे आहेत आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत हरवू किंवा नाही याचा विचारच करू नका. पहिल्यांदा कॉँग्रेसच्या मुळांमध्ये जाऊन राजकीय पक्ष म्हणून उभारण्याचे प्रयत्न करायला हवेत.

    प्रशांत किशोर म्हणाले, माझ्या आणि राहूल गांधी यांच्या विचारांत खूप अंतर आहे. त्यांनावाटते की परंपरागत पध्दतीने आपण कॉँग्रेसला पुन्हा उभारी देऊ शकतो. परंतु, माझे मत आहे की कॉँग्रेसला पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर परंपरागत पध्दतींपेक्षा काहीतरी वेगळे करायला हवे.

    प्रशांत किशोर म्हणाले, कॉँग्रेसचे पतन १९८५ पासूनच सुरू झाले होते हे मान्य करायला तयार नाहीत. १९८९ च्या निवडणुकांत राजीव गांधी यांच्या नेतृत्वााली कॉग्रेसच्या १९७ जागा आल्या होत्या. त्यांनंतर प्रत्येकाने त्यांना पराभूत म्हणून हिणवायला सुरूवात केली.

    त्यानंतर २००४ साली कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार बनले तेव्हा पक्षाच्या केवळ १४५ जागा मिळाल्या होत्या. खरे तर १९८५ पासूनच कॉँग्रेसचे पतन सुरू आहे. मात्र, या मुद्यावर माझे आणि राहूल गांधी यांचे मतभेद आहेत.

    Prashant Kishor says differences with Rahul Gandhi, he should focus on rebuilding the party rather than defeating Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan : भारतातून 6 दिवसांत 786 लोकांना पाकिस्तानला पाठवले; यामध्ये 9 राजनयिक आणि अधिकाऱ्यांचा समावेश

    Jagmeet Singh : कॅनडा निवडणुकीत खलिस्तान समर्थक जगमीत सिंग पराभूत; PM मार्क कार्नी यांना बहुमतासाठी 5 जागा कमी

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??