देशात सर्वाधिक दलीत लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्षानं हातमिळवणी केलीय. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी या संबंधी अधिकृत घोषणा केली.Political equations in Punjab to change, Akali Dal-Bahujan Samaj Party alliance to undermine Congress Dalit votes
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : देशात सर्वाधिक दलीत लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्षानं हातमिळवणी केलीय.
शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी या संबंधी अधिकृत घोषणा केली.कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिध्दू यांच्यात सुरू असलेल्या गटबाजीनंतर आणखी एक मोठे आव्हान या युतीमुळे निर्माण झाले आहे. दलीत मतांच्या जोरावरच गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने यश मिळविले होते.
पंजाबच्या राजकारणातील नवी पहाट असे म्हणत शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी युतीची घोषणा केली आहे. आज ऐतिहासिक दिवस आहे. पंजाबमधल्या राजकारणातली ही एक मोठी घटना आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शिरोमणी अकाल दील आणि बसपा एकत्रितरित्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकांसहीत इतर निवडणुका लढणार आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या एकूण ११७ विधानसभा जागांपैंकी मायावतींचा पक्ष बसपा २० जागांवर तर अकाली दल ९७ जागांवर निवडणूक लढणार आहे.
बसपाच्या वाट्याला जालंधर, करतारपूर साहेब, जालंधर पश्चिम, जालंधर उत्तर, फगवाडा, होशियारपूर सदर, दासुया, रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहेब, पठाणकोट जिल्ह्यातील बस्सी पठाना, सुजानपूर, अमृतसर उत्तर आणि अमृतसर मध्य या जागा येणार आहेत.
कृषी विधेयकावरून मतभेद झाल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिरोमणी अकाली दलानं भाजपशी नाते तोडले होते. शिरोमणी अकाली दल काँग्रेस, भाजप किंवा आम आदमी पक्ष यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्यास तयार असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी म्हटलं होतं.
अकाली दल आणि बसपा यांच्यात तब्बल २७ वर्षांनंतर युती होत आहे. यापूर्वी हे दोन्ही पक्ष १९९६ साली लोकसभा निवडणुका एकत्र लढले होते. त्यावेळी, पंजाबच्या १३ जागांपैंकी ११ जागा जिंकण्यात अकाली दल-बसपाला यश मिळालं होतं.
मायावतींच्या नेतृत्वाखाली बसपाने तीन जागांवर विजय मिळवला होता. तर अकाली दलानं १० पैंकी ८ जागांवर विजय मिळवला होता. पंजाबमध्ये दलित लोकसंख्या जवळपास ४० टक्के आहे. या मतांवर बसपाची घट्ट पकड आहे.
Political equations in Punjab to change, Akali Dal-Bahujan Samaj Party alliance to undermine Congress Dalit votes
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारने नाही लोकांनीच करून दाखविले, मुंबईतील धारावी, पुण्यातील भवानी पेठेत मिळाला नाही एकही कोरोना रुग्ण
- आयएसआय झाली आधुनिक!, आता दहशतवादी हल्यांसाठी महिलांचाही वापर
- पुढील पिढीसाठी पृथ्वीला सदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
- कर्नाटकाच्या झेंड्याच्या रंगाची बिकिनी आणि राजचिन्हही, अॅमेझॉनवर कन्नड नागरिक संतप्त