• Download App
    प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पोलिसांनी सक्रिय केली 'सोशल मीडिया लॅब'|Police activate social media lab Against provocative posts in Mumbai Maharashtra

    प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पोलिसांनी सक्रिय केली ‘सोशल मीडिया लॅब’

    राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची आता खैर नाही. प्रत्यक्षात अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत पोलिसांनी ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय केली आहे.Police activate social media lab Against provocative posts in Mumbai Maharashtra


    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची आता खैर नाही. प्रत्यक्षात अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत पोलिसांनी ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय केली आहे.

    पोलिसांनी तीन हजार पोस्ट हटवल्या

    मुंबई पोलिसांनी सक्रिय केलेल्या ‘सोशल मीडिया लॅब’च्या माध्यमातून आतापर्यंत अशा 3000 आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आल्या आहेत, ज्यांचा वापर जातीय तेढ भडकवण्यासाठी केला जाणार होता.

    ३ मेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी घेण्याच्या सूचना

    दुसरीकडे, नाशिकचे सीपी दीपक पांडे म्हणाले की, “सर्व धार्मिक स्थळांना ३ मेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 3 मे नंतर आदेशाचे कोणी उल्लंघन करताना आढळून आल्यास, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

    हनुमान चालिसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी आवश्यक- नाशिक सी.पी

    हनुमान चालिसा किंवा भजन भोंग्यांवरून वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले. अज़ानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटांच्या आत परवानगी दिली जाणार नाही. मशिदीच्या 100 मीटरच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे हा या आदेशामागचा उद्देश असल्याचे ते पुढे म्हणाले.

    काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?

    त्याच वेळी, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “राज्याचे पोलीस आणि मुंबई आयुक्त बसून निर्णय घेतील आणि लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवतील. अशी परिस्थिती (धार्मिक तणाव) हाताळण्यासाठी पोलीस तैनात असतात. कोणत्याही प्रकारचा तणाव होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

    Police activate social media lab Against provocative posts in Mumbai Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!