• Download App
    PM Modi INS Vikrant Diwali Operation Sindoor Pakistan Surrender INS विक्रांतवर पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी, म्हणाले-

    PM Modi : INS विक्रांतवर पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी, म्हणाले- ऑपरेशन सिंदूरवेळी तिन्ही दलांनी पाकिस्तानची झोप उडवली

    PM Modi

    वृत्तसंस्था

    पणजी : PM Modi तिन्ही सशस्त्र दलांमधील असामान्य समन्वय तसेच नौदलाने निर्माण केलेली भीती, हवाई दलाचे असाधारण कौशल्य व लष्कराच्या शौर्यामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला काही क्षणांतच गुडघे टेकावे लागले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले. आयएनएस विक्रांतने पाकिस्तानची झोप कशी उडवली होती हेही आपण पाहिल्याचे मोदींनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने नवीन ध्वज स्वीकारला याचाही उल्लेख मोदींनी भाषणातून केला. गोव्याच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली. त्या वेळी मोदी म्हणाले की, ‘स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.’PM Modi

    जवानांना मिठाई दिली; गाणे, जेवणही सोबत…

    मोदींनी आयएनएस विक्रांतवर एक रात्र घालवली आणि मिग २७ विमानाची कौशल्ये पाहिली. सांस्कृतिक कार्यक्रमात मोदींच्या उपस्थितीत भारतीय नौदलातील अधिकारी आणि जवानांनी विविध देशभक्तिपर गाणी गायली. ज्यात ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्यदलाच्या यशावर त्यांनी खास लिहिलेले गाणे समाविष्ट होते. त्यानंतर मोदींनी बारा खानादरम्यान नौदल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह रात्रीचे जेवण केले. सोमवारी सकाळी मोदी योग सत्रात सामील झाले आणि युद्धनौकांचा एक नेत्रदीपक स्टीमपास्ट आणि विमानांनी केलेला फ्लायपास्टदेखील पाहिला.PM Modi



    २०१४ पासून मोदींची दिवाळी जवानांसोबतच

    पंतप्रधान २०१४ पासून सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यंदाची त्यांची ही १२ वी वेळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी गुजरातमधील कच्छला भेट दिली होती, जिथे त्यांनी बीएसएफ, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सैनिकांना मिठाई वाटली होती. गेल्या ११ वर्षांत पंतप्रधानांनी दिवाळीसाठी जम्मू आणि काश्मीरला सर्वाधिक चार वेळा भेट दिली आहे.

    नक्षलमुक्त १०० जिल्ह्यांत मोकळा श्वास

    २०१४ पूर्वी देशभरातील सुमारे १२५ जिल्हे नक्षली हिंसाचाराने ग्रस्त होते. गेल्या १० वर्षांच्या कठोर परिश्रमामुळे ही संख्या आज फक्त ११ वर आली आहे. त्या ११ पैकीही फक्त तीन जिल्हे नक्षलवादाने जास्त पीडित आहेत. नक्षल्यांच्या दहशतीपासून मुक्त झालेले १०० जिल्हे या वर्षी भव्य दिवाळी साजरी करत प्रथमच मोकळा श्वास घेत आहेत, असेही मोदींनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना आपल्या हाताने मिठाई खाऊ घातली.

    “आयएनएस विक्रांतवर घालवलेली रात्र शब्दात मांडणे कठीण आहे. तुम्ही सर्वजण किती प्रचंड ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले आहात ते मी पाहिले. जेव्हा मी तुम्हाला देशभक्तिपर गाणी गाताना पाहिले आणि तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे वर्णन केले तेव्हा युद्धभूमीवर उभे राहून जवानाला कसा अनुभव येतो हे शब्दात पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. माझी दिवाळी तुमच्यामध्ये घालवल्यामुळे ती खास राहिली आहे,” असे मोदी म्हणाले. मी तुमच्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो आहे. तुमची तपस्या, तुमची भक्ती, तुमचे समर्पण इतके उच्च आहे की मी ते जगू शकलो नाही, परंतु मला ते नक्कीच कळले, अशी भावनाही मोदींनी व्यक्त केली.

    PM Modi INS Vikrant Diwali Operation Sindoor Pakistan Surrender

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ola CEO Bhavish Aggarwal : ओलाचे CEO भाविश अग्रवाल यांच्याविरोधात FIR; अभियंत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

    Bihar Congress : पैसे देऊन तिकिटे विकली, बिहार काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, नेत्यांचा थेट आरोप — “दहा जागाही जिंकणार नाही पक्ष

    Nilgiri Railway : तामिळनाडूच्या नीलगिरी रेल्वे मार्गावर भूस्खलन, अनेक ट्रेन रद्द, पुढील 7 दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा