Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमधील 6 शहिदांची नावे प्रथमच सार्वजनिक; यात 5 लष्करी, 1 हवाई दलाचा जवान
ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या भारतीय सशस्त्र दलातील 6 जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आली आहेत. ही नावे नॅशनल वॉर मेमोरियलच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या 3D भिंतीवर 2025 च्या विभागातही त्यांची नावे कोरण्यात आली आहेत.