नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेचे खासदार शरद पवारांना साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालयात (PMO मध्ये) भेट दिली. त्याचा फोटो PMO च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्याचे वर्णन राज्यसभेचे खासदार शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले एवढेच करण्यात आले आहे. मात्र, त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक अधिकृत ट्विटर हँडलवरून घेण्यात आलेली नाही. PM modi did not share photo of sharad pawar meeting on his own twetter handle
शरद पवारांनी आपल्या @PawarSpeaks ट्विटर हँडलवरून मोदी भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. त्यांच्याशी राष्ट्रीय महत्त्वाच्या मुदद्यांवर चर्चा केली एवढेच नमूद केले आहे.
सामान्यतः पंतप्रधानांच्या सरकारी भेटींची दखल PMO कार्यालय घेते. तर स्वतः मोदी आपल्या विशेष भेटींची दखल स्वतःच्या ट्विटर हँडलवरून घेताना दिसतात. मोदी जास्तीत जास्त public intrest चे विषय आपल्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर करताना दिसतात. क्रीडा, विज्ञान, सामाजिक कामे पायाभूत सुविधांची कामे, इतर विकासकामे यांच्यावर त्यांचा भर दिसतो.
नुकताच मोदींनी ऑलिंपिंक खेळाडूंशी संवाद साधला. त्यातल्या प्रत्येक खेळाडूबरोबचा संवाद मोदींनी वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. मन की बात हे त्यांचे नेहमीचे शेअरिंग दिसते.
परंतु, गेल्या काही दिवसांचा मोदींच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरचा राजकीय आढावा घेतला, तर मोदींनी काही विशिष्ट घटना आणि व्यक्तींच्या भेटींचे फोटो त्यावर शेअर केलेले दिसतात.
मध्यंतरी जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक ७ लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली होती. त्याचा फोटो मोदींनी आपल्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे त्यांनी राज्यातल्या जिल्हा पंचायत निवडणूकीतील यशाबद्दल अभिनंदन केले आहे. तामिळनाडू विधानसभेत निवडून आलेल्या भाजपच्या ४ आमदारांनी मोदींची भेट घेतली होती. त्याचाही फोटो मोदींनी वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. त्याच बरोबर पुद्दुचेरी विधानसभेत निवडून आलेल्या भाजपच्या १६ आमदारांनी मोदींची भेट घेतली होती. त्याचाही फोटो मोदींनी त्यावरच शेअर केला होता.
या अर्थ एवढाच की मोदी फक्त public intrest चे विषय आपल्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर करताना दिसतात, असे नाही. तर त्यांना स्वतःला ज्या राजकीय भेटी महत्त्वाच्या वाटतात, त्यांचे फोटो देखील मोदी हे वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर करताना दिसतात. मात्र आजचा शरद पवारांना भेट दिल्याचा फोटो मोदींनी आपल्या वैयक्तिक हँडलवरून शेअर केलेला दिसत नाही.