विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता आज जारी करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी यातून होत असलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.PM interacts with farmers in Maharashtra, Goa, distributes Rs 19,500 crore to 10 crore farmers through PM-Kisan Yojana
मारे नऊ कोटी ७५ लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आज थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी करण्यात आली. पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकºयांना आतापर्यंत एक लाख 60 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.
गोव्यातील महिला लाभार्थी प्रतिभा वेळीप पंतप्रधानांशी संवाद साधताना म्हणाल्या, त्या काजू, नारळ, केळी अशी मिश्र शेती करतात. भातलागवडीसाठी त्यांनी श्री पद्धतीचा अवलंब केला आहे. या पद्धतीमुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते. पंतप्रधानांनी वेळीप यांना पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेचा काही लाभ होतो का, असे विचारले. त्यावर पीएम-किसान योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून खते, बी-बियाणे आणि कीटकनाशकांची खरेदी केली आहे. पीएम-किसान योजनेचा कुटुंबाला चांगला लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी रत्नागिरी येथील आंबा उत्पादक शेतकरी देवेंद्र झापडेकर यांच्याशीही संवाद साधला. झापडेकर यांनी कृषी पायाभूत सुविधा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे. यातून त्यांनी आंबा पिकवणी केंद्र उभारले आहे. यामुळे अगदी 4-5 दिवसांत नैसर्गिकरीत्या आंबा पिकवता आला.
पूर्वी पारंपरिक पद्धतीने आंबे पिकवल्यामुळे 20-30 टक्के फळांचे नुकसान होत होते. मात्र, पिकवण केंद्रामुळे पिकांचे नुकसान होत नाही, तसेच वेळेची बचत झाल्याचे देवेंद्र यांनी सांगितले.अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शेती व्यवसायाकडे वळलेल्या देवेंद्र यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभरात 2,000 रुपयाचे तीन हप्ते असे एकूण 6,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण योजनेतून जमा केले जातात.
PM interacts with farmers in Maharashtra, Goa, distributes Rs 19,500 crore to 10 crore farmers through PM-Kisan Yojana
महत्त्वाच्या बातम्या
- वीर सावरकरांबद्दल अपुऱ्या माहितीवरून ट्विट करणे ही माझी चूक; भाजप आमदार नितेश राणेंची कबुली
- पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांकडून नुकसान
- Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
- सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी
- पिंपरी चिंचवडमध्ये चक्क बॉम्ब ,इमारतीचे खोदकाम सुरु असताना आढळला; ब्रिटिशकालीन असल्याचा अंदाज